कसं असेल मेष राशीचं आर्थिक वर्ष?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 November 2019

मागील वर्षी नोकरीसंदर्भातील जी स्वप्ने पूर्ण करू शकला नाहीत, ती 4 नोव्हेंबरनंतर साकार होतील.

मेष :

व्यवसायाच्या दृष्टीने या राशीच्या व्यक्तींंना आगामी वर्ष समाधानकारक राहणार आहे. व्यवसायात महत्त्वाचे उपक्रम राबवू शकाल. आगामी कालखंड व्यवसाय, आर्थिक लाभ, व्यवसायातील उलाढाल व नवनवीन संधी यासाठी चांगला आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

4 नोव्हेंबरपासून गुरू भाग्यस्थानी जात आहे. शनीही भाग्यस्थानात आहे. 25 जानेवारी 2020 रोजी शनी दहाव्या स्थानात जात आहे. त्यामुळे व्यवसायाच्यादृष्टीने ग्रहमान अनुकूल आहे. व्यवसायात नवनवीन संधी लाभतील. नवीन संपर्क निर्माण होतील. 

- 'टाटा मोटर्स'चा इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी करार 

Image may contain: outdoor

शेअर्समध्ये धाडस करू शकता

बाजारपेठेचा अभ्यास करून व्यवसायात व शेअर्समध्ये धाडस करायला हरकत नाही. नोकरीच्या दृष्टीने 4 नोव्हेंबरनंतरचा कालखंड अत्यंत चांगला ठरणार आहे. मागील वर्षी नोकरीसंदर्भातील जी स्वप्ने पूर्ण करू शकला नाहीत, ती 4 नोव्हेंबरनंतर साकार होतील. सुसंधी लाभेल. 

- वीज वितरण कंपन्यांच्या खासगीकरण आवश्यक : एन. चंद्रशेखरन

Image may contain: 2 people, people sitting

महिलांसाठी काय?

महिलांना हे वर्ष अत्यंत चांगले आहे. आपल्या कलागुणांना वाव मिळेल. तुम्ही नवे हितसंबंध निर्माण करू शकाल. कौटुंबिकदृष्ट्या हे वर्ष चांगले आहे. कौटुंबिक सौख्य लाभणार आहे. मुलामुलींचे नोकरी, व्यवसायाचे प्रश्नड सुटतील.

- आयटी क्षेत्रालाही मंदीचा फटका; हजारो नोकऱ्या जाण्याची भीती

No photo description available.

नोकरीत चांगल्या संधी

नोकरीत असाल तर चांगली संधी मिळेल. प्रसिद्धी मिळेल. गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना हे वर्ष खूप चांगले आहे. विशेषत: 19 मार्च ते 29 जून 2020 हा कालखंड गुंतवणुकीला अत्यंत चांगला आहे.

- एअरटेलचा तोटा गगनला भिडला; वाचा किती झालाय तोटा?

थोडक्याीत, या राशीच्या व्यक्तीं ना नोकरीमध्ये हे वर्ष अत्यंत चांगले आहे. तुमच्या कर्तृत्वाला संधी मिळणार आहे, अनुभवाचे चीज होणार आहे. तुमच्यावर एखादी चांगली जबाबदारी सोपविली जाईल. बढती मिळू शकेल, पगारवाढही होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How will financial year 2020 for Aries