बँक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार; 35 हजार जणांना बसणार फटका

बँक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार; 35 हजार जणांना बसणार फटका

हाँगकाँग : एचएसबीसी बॅंकेच्या नफ्यात सलग तिसऱ्या वर्षी घसरण झाल्याने बॅंकेने ३५ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर अमेरिका आणि युरोपमधील व्यवसायही कमी करण्याचे पाऊल बॅंक उचलणार आहे. 

अमेरिका-चीन व्यापारयुद्ध, युरोपीय समुदायातून ब्रिटनचे बाहेर पडणे आणि चीनमधील कोरोना विषाणूचा उद्रेक, यामुळे बॅंकेसमोर मोठ्या प्रमाणात अनिश्‍चिततेचे वातावरण आहे. बॅंकेचा आशियातील व्यवसाय मागील काही वर्षांत उत्तमरीत्या सुरू आहे. प्रामुख्याने चीनमध्ये बॅंकेचा व्यवसाय चांगला आहे. याच वेळी युरोप आणि अमेरिकेत मात्र बॅंकेचा व्यवसाय फारसा समाधानकारक नाही. बॅंकेने २०२२ खर्चात ४.५ अब्ज डॉलरची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

बॅंकेकडून पुनर्रचना सुरू असून, यासाठी बॅंकेला ६ अब्ज डॉलरचा खर्च येणार आहे. अमेरिका आणि युरोपमधील व्यवसाय कमी करून बॅंक आशिया आणि मध्य-पूर्वेतील व्यवसायावर अधिक भर देणार आहे. याचबरोबर शाखांची संख्या ३० टक्‍क्‍यांनी कमी करून बॅंक खर्चात १० ते १५ टक्के बचत करेल.
बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरून जॉन फ्लिंट यांची हकालपट्टी झाल्यानंतर नोएल क्वीन यांच्यावर ही हंगामी जबाबदारी आहे.

जगभरातील सुमारे ५० हून अधिक देशांमध्ये विस्तारलेल्या बॅंकेला सर्वाधिक नफा आशियातून मिळत आहे. क्वीन यांनी बॅंकेची पुनर्रचना करण्याचे पाऊल उचलले आहे. याविषयी क्वीन म्हणाले की, बॅंकेला अपेक्षेप्रमाणे नफा मिळालेला नाही. यामुळे काही रचनात्मक बदल करण्यात येणार आहेत. जगभरात कंपनीचे २ लाख ३५ हजार कर्मचारी असून, आगामी तीन वर्षांत त्यांची संख्या २ लाखांवर आणण्यात येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com