मी अपघाताने नवउद्यमींमधील गुंतवणूदार - रतन टाटा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

मुंबई : आर्थिक पाठबळ देऊन नवउद्यमींचे (स्टार्टअप) आधारस्तंभ बनलेले टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी "स्टार्टअप'मधील गुंतवणुकीमागचे गुपीत उघड केले आहे. टाटा यांनी आपण अपघाताने स्टार्टअप्समधील गुंतवणूकदार बनलो, असे मत व्यक्त केले आहे. आतापर्यंत डझनभर स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणाऱ्या टाटा यांनी नवउद्यमींच्या वृद्धीबाबत आशावाद व्यक्‍त केला आहे. 

टाटा समूहात सक्रीय असताना स्टार्टअप्सला एका औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टीकोनातून बघितले. मात्र त्यावेळी काही मर्यादेमुळे स्टार्टअपबाबत निर्णय घेऊ शकलो नाही. मी ज्यावेळी निवृत्त झालो त्यानंतर आकर्षक स्टार्टअप्समध्ये छोट्या प्रमाणात गुंतवणूक सुरू केली. मी अपघाताने स्टार्टअप्समधील गुंतवणूकदार झालो, असे टाटा यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारे जोखीम घेऊन विविध क्षेत्रातील स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक वाढवली. दोन ते तीन वर्षांतील गुंतवणूक मला बरेच काही शिकवून गेली.

हे क्षेत्र प्रचंड सक्रीय असल्याचे मत टाटा यांनी व्यक्त केले. काही स्टार्टअप्स नुकसानीत असले तरी त्याबद्दल चिंता करण्याची गरज नाही, इतर देशांचा विचार करता स्टार्टअप्स या दिर्घकाळ तग धरून राहतात त्याप्रमाणे भारतातदेखील स्टार्टअप्स नक्कीच वाढतील, असा विश्‍वास टाटा यांनी व्यक्त केला. तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात नवउद्यमी आपले नशीब आजमावत आहेत. त्याचप्रमाणे आरोग्यसेवा, वैद्यकीय उपचार, ऑनलाईन आणि उत्पादन आदी क्षेत्रांमध्ये स्टार्टअप्सला प्रचंड संधी असल्याचे टाटा यांनी म्हटले आहे. टाटा यांनी ओला, पेटीएम, स्नॅपडील, कारदेखो, अर्बनलॅडर यासारख्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केलेली आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I accidentally invested in new ventures - Ratan Tata