प्राप्तिकर खात्याची टाटा ट्रस्टला नोटीस 

Cyrus Mistry, Ratan Tata
Cyrus Mistry, Ratan Tata

मुंबई: सामाजिक कार्यासाठी मिळालेल्या कर सवलतीचा गैरवापर केल्याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने टाटा ट्रस्टला नोटीस बजावली आहे. "कॅग'च्या अहवालातील नोंदीनुसार ही नोटीस पाठवण्यात आली आहे. यामुळे टाटा ट्रस्टच्या अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे. 

"कॅग'ने 2013 मध्ये केलेल्या निरीक्षणानुसार टाटा ट्रस्टने काही वर्षांत मोठा नफा मिळवला आहे. त्या तुलनेत सामाजिक कार्यासाठी फारसा खर्च केलेला नाही. सामाजिक कार्यासाठी मिळालेल्या निधीचा ट्रस्टने कर टाळण्यासाठी गैरवापर केला. या निधीचा स्थावर मालमत्तेसाठी वापर केला, असा ठपका "कॅग'ने ठेवला आहे. 

जमशेदजी टाटा ट्रस्ट आणि नवाजबाई रतन टाटा ट्रस्ट या संस्थांनी चुकीच्या पद्धतीने 3 हजार 139 कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यातून तब्बल 1,066 कोटी 95 लाखांचा भांडवली नफा कमावल्याचे "कॅग'ने म्हटले आहे. "कॅग'च्या अहवालानुसार 2009 आणि 2010 मध्ये झालेली गुंतवणूक आणि नफ्याबाबत ट्रस्टकडून खुलासा मागवण्यात आला आहे. अर्थ खात्यानेही याची गंभीर दखल घेतली आहे. प्राप्तिकर खात्याला चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सायरस मिस्त्री आणि टाटा सन्समध्ये वाद सुरू असताना गैरव्यवहारांची चौकशी झाल्याने रतन टाटाप्रमुख असलेला टाटा ट्रस्ट चर्चेत आला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com