सोनिया आणि राहुल गांधींना 100 कोटींची नोटीस

वृत्तसंस्था
बुधवार, 9 जानेवारी 2019

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने ‘नॅशनल हेरॉल्ड’प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी या दोघांना मिळून 100 कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे. प्राप्तिकर विभागाने बजावलेल्या नोटिशीमुळे आता विरोधक यांच्यातील वाढ पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांचे 2011-12 मधील उत्पन्न 155.41 कोटी रुपये तर याच कालावधीतील सोनिया गांधी यांचे उत्पन्न 155 कोटी रुपये इतके होते. तसेच ऑस्कर फर्नांडिस यांचे याच कालावधीत उत्पन्न 49 कोटी रुपये इतके होते.

 सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबरमध्ये सोनिया गांधी, त्यांचे पुत्र राहुल गांधी आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्या वर्ष 2011-12 मधील प्राप्तिकराची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले होते. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सोनिया गांधी आणि राहुल यांनी सुमारे 300 कोटी रुपयांचे उत्पन्न लपवले असून यासाठी त्यांनी 100 कोटी रुपये भरण्याची नोटीस प्राप्तिकर विभागाने पाठवली आहे. पुनर्मूल्यांकन केल्यानंतर 31 डिसेंबर रोजी दोघांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे.

सोनिया आणि राहुल यांनी यंग इंडिया कंपनीमध्ये 38 टक्के मालकी  होती. शिवाय ऑस्कर फर्नांडिस आणि मोतीलाल व्होरा यांच्या मालकीच्या या कंपनीला काँग्रेस सरकारच्या काळात सुमारे 90 कोटी रुपायांचे कर्ज माफ करण्यात आले होते. त्यातून देखील कंपनीला फायदा झाला आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या कंपनीचे भागीदार असलेले सोनिया आणि राहुल यांना देखील फायदा झाला असल्याचा आरोप आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I-T dept slaps Rs 100 crore tax notice to Rahul, Sonia Gandhi