आता 29 ते 31 मार्च दरम्यानही 'इन्कम टॅक्‍स रिटर्न' भरा

पीटीआय
मंगळवार, 27 मार्च 2018

सर्वसामान्य नागरिकांची  अडचण लक्षात घेऊन प्राप्तिकर विभागाने 29 ते 31 मार्च यादरम्यान प्राप्तिकर कार्यालय आणि प्राप्तिकर सेवा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

नवी दिल्ली : प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्‍स रिटर्न) भरण्यासाठी मार्च महिना हा तसा लगबगीचा असतो. 31 मार्चपर्यत प्राप्तिकर भरणा करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करायची असते. चालू आठवड्यात बॅंकांना गुरुवार आणि शुक्रवारी अनुक्रमे महावीर जयंती व गुड फ्रायडेनिमित्त सुटी आहे. 31 मार्चला बॅंका चालू राहणार आहेत. 1 एप्रिलला रविवारी पुन्हा सुटी आहे. यामुळेच सर्वसामान्य नागरिकांची  अडचण लक्षात घेऊन प्राप्तिकर विभागाने 29 ते 31 मार्च यादरम्यान प्राप्तिकर कार्यालय आणि प्राप्तिकर सेवा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

नागरिकांना सुविधा देण्यासाठी प्राप्तिकर विभागाची कार्यालये आणि प्राप्तिकर सेवा केंद्र 29 ते 31 मार्च दरम्यान खुली राहणार आहेत, असे केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या वक्तव्यात म्हटले आहे.

तसेच गेल्या आर्थिक वर्षाचे प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्‍स रिटर्न) ज्यांनी अजूनही भरलेले नसेल, त्यांनाही आता तातडीने पावले उचलायला लागणार आहेत. 

Web Title: I-T offices to remain open from Mar 29-31 for filing returns