केंद्रीय अर्थसंकल्पातील रेल्वेचा समावेश स्वेच्छेने : प्रभू

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 एप्रिल 2017

रेल्वेसाठी निधीचा केवळ केंद्रीय अर्थसंकल्प हाच स्त्रोत आहे. अरुण जेटली यांनी त्यांच्यासमोर अनेक प्राधान्यक्रम असल्याचे म्हटले होते. मी अर्थमंत्री असतो तर हेच म्हटलो असतो. रेल्वे अर्थसंकल्पाचा केंद्रीय अर्थसंकल्पात समावेश करण्याची तयारी मी स्वत: दर्शविली होती.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्प समाविष्ट करण्याची भूमिका मी स्वत: घेतली होती, असे स्पष्टीकरण रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी दिले. अर्थमंत्रालयाने रेल्वे अर्थसंकल्प हिरावून घेतल्याचा त्यांनी इन्कार केला.

सुरेश प्रभू म्हणाले, "रेल्वेसाठी निधीचा केवळ केंद्रीय अर्थसंकल्प हाच स्त्रोत आहे. अरुण जेटली यांनी त्यांच्यासमोर अनेक प्राधान्यक्रम असल्याचे म्हटले होते. मी अर्थमंत्री असतो तर हेच म्हटलो असतो. रेल्वे अर्थसंकल्पाचा केंद्रीय अर्थसंकल्पात समावेश करण्याची तयारी मी स्वत: दर्शविली होती. अर्थ मंत्रालयाने तो हिरावून घेतला नाही. दोन्ही अर्थसंकल्पाचे एकत्रीकरण स्वेच्छेने झाले आहे.''

रेल्वे अर्थसंकल्प 1924 पासून संसदेत मांडण्यात येत होता. रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे मांडण्यासाठी घटनात्मक तसेचल कायदेशीर तरतूद काहीही नाही. त्यामुळे रेल्वेसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याची सुमारे शतकाची जुनी परंपरा सरकारने यावर्षीपासून बंद केली. रेल्वे अर्थसंकल्पाचा केंद्रीय अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 1 फेब्रुवारीला मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेचाही समावेश होता.

Web Title: I voluntarily gave up rail budget, says Suresh Prabhu