चंदा कोचरयांच्यावरून आयसीआयसीआयच्या संचालकात मतभेद? 

वृत्तसंस्था
सोमवार, 9 एप्रिल 2018

खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर यांच्यासमोरील अडचणी वाढतच चालल्या आहेत. दोन आठवड्यांपूर्वीच चंदा कोचर यांच्यावरील आरोप निराधार असल्याचे बॅंकेच्या संचालक मंडळाने म्हटले होते. आता मात्र कोचरयांच्यावरून आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळात मतभेद असल्याचे बोलले आत आहे.

मुंबई: खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर यांच्यासमोरील अडचणी वाढतच चालल्या आहेत. दोन आठवड्यांपूर्वीच चंदा कोचर यांच्यावरील आरोप निराधार असल्याचे बॅंकेच्या संचालक मंडळाने म्हटले होते. आता मात्र कोचरयांच्यावरून आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळात मतभेद असल्याचे बोलले आत आहे.

 आयसीआयसीआय बँकेच्या एका संचालकाने चंदा कोचर यांच्या सध्याच्या बँकेतील भूमिकेस विरोध दर्शविला असल्याचे बोलले जात आहे. सीईओ म्हणून कोचर यांचा चालू कार्यकाळ 31 मार्च 2019 अखेर संपणार आहे. मात्र बँकेच्या संचालक मंडळात मतभेद असल्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

 व्हिडिओकॉन समूहाला कर्ज मंजूर करताना आयसीआयसीआय बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लाभ घेतल्याचा आरोप एका वृत्तसंस्थेने केल्याने बॅंकिंग क्षेत्रात खळबळ उडाली होती; मात्र त्यांच्यावरील आरोप निराधार असल्याचे बँकेने सांगत त्यांना पाठिंबा दिला होता. 

आज (सोमवार) मुंबई शेअर बाजारात आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये किरकोळ घसरण झाली असून सध्या तो  279.90 रुपयांवर व्यवहार करतो आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार बँकेचे 179,887.39 कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे. 

Web Title: ICICI Bank Board Divided Over CEO Chanda Kochhar