आयसीआयसीआय बॅंकेला ५९ कोटींचा दंड 

पीटीआय
शुक्रवार, 30 मार्च 2018

मुंबई - रोख्यांची थेट विक्री करण्याबाबतच्या रिझर्व्ह बॅंकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयसीआयसीआय बॅंकेला ५८.९ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

मुंबई - रोख्यांची थेट विक्री करण्याबाबतच्या रिझर्व्ह बॅंकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयसीआयसीआय बॅंकेला ५८.९ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

रिझर्व्ह बॅंकेने आयसीआयसीआय बॅंकेला ५८.९ कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याचा आदेश २६ मार्चला काढला. आयसीआयसीआय बॅंकेने रोख्यांची थेट विक्री करताना रिझर्व्ह बॅंकेने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले आणि या व्यवहाराचे तपशीलही जाहीर केले नाहीत. रिझर्व्ह बॅंकेला बॅंकिंग नियामक कायदा १९४९ नुसार मिळालेल्या अधिकारांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. बॅंकेने खरेदी केलेले रोखे त्यांची मुदत पूर्ण होईपर्यंत ठेवण्याचा हेतू असतो. या रोख्यांची विक्री दैनंदिन स्वरूपात करता येत नाही. अपवादात्मक परिस्थितीत त्यांची विक्री करता येते. रोख्यातील एकूण गुंतवणुकीच्या पाच टक्‍क्‍यांपेक्षा अधिक विक्री असल्यास याची माहिती उघड करणे आवश्‍यक असते. आर्थिक वर्षात आयसीआयसीआय बॅंकेने ५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक रोखे विकले आहेत.

Web Title: ICICI Bank fined Rs 59 crores