आता पैसे भरल्यानंतरही लागणार चार्जेस!

वृत्तसंस्था
रविवार, 15 सप्टेंबर 2019

बँकेत पैसे भरण्यासाठी यापूर्वी कोणतेही चार्जेस आकारले जात नव्हते. मात्र, आता मशिन्सच्या माध्यमातून पैसे भरल्यानंतर अतिरिक्त चार्जेस आकारले जाणार आहेत.

नवी दिल्ली : बँकेत पैसे भरण्यासाठी यापूर्वी कोणतेही चार्जेस आकारले जात नव्हते. मात्र, आता मशिन्सच्या माध्यमातून पैसे भरल्यानंतर अतिरिक्त चार्जेस आकारले जाणार आहेत. याबाबत आयसीआयसीआय बँकेकडून निर्णय घेण्यात आला आहे. 

झिरो बॅलेन्स असणाऱया खातेधारकाला 16 ऑक्टोबरपासून रक्कम काढण्यासाठी 100 रुपयांपासून 125 रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाणार आहे. तसेच खातेधारकाच्या बँक खात्यात मशिन्सच्या माध्यमातून पैसे जमा करण्यात येत असतील तर अशा ग्राहकांनाही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. आयसीआयसीआय बँकेने खातेधारकांना याबाबत एक नोटीस जारी केली. यामध्ये ही माहिती दिली.

- मशिन्सच्या माध्यमातून पैसे जमा केल्यानंतही लागणार चार्ज.

- मोबाईल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंगसाठी होणाऱ्या एनईएफटी, आरटीजीएस किंवा यूपीआय ट्रान्झॅक्शन फ्री 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: icici bank impose charge on deposit and withdrawal throgh bank branches