आयसीआयसीआय बॅंकेच्या नफ्यात घसरण

पीटीआय
मंगळवार, 8 मे 2018

नवी दिल्ली - आयसीआयसीआय बॅंकेच्या एकूण नफ्यात मार्चअखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत ४५ टक्के घसरण झाली आहे. या तिमाहीत बॅंकेला १ हजार १४२ कोटी रुपयांचा एकूण नफा झाला.  

नवी दिल्ली - आयसीआयसीआय बॅंकेच्या एकूण नफ्यात मार्चअखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत ४५ टक्के घसरण झाली आहे. या तिमाहीत बॅंकेला १ हजार १४२ कोटी रुपयांचा एकूण नफा झाला.  

आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये चौथ्या तिमाहीत बॅंकेला २ हजार ८३ कोटी रुपयांचा एकूण नफा झाला होता. या तिमाहीतील बॅंकेचा निव्वळ नफा २ हजार २५ कोटी रुपये होता. त्या तुलनेत मागील आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत बॅंकेच्या निव्वळ नफ्यात ५० टक्के घसरण होऊन तो १ हजार २० कोटी रुपयांवर आला आहे. काही कंपन्यांनी दिलेल्या कर्जाच्या बदल्यात बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्या कुटुंबीयांना लाभ मिळाल्याचे आरोप झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर बॅंकेच्या नफ्यात घसरण नोंदविण्यात आली आहे.

Web Title: ICICI Bank Profit Decrease