‘आयसीआयसीआय’ला बुडीत कर्जांनी ग्रासले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

मुंबई - बुडीत कर्जांसाठी भरभक्कम तरतूद करावी लागल्याने आयसीआयसीआय बॅंकेच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत किरकोळ वाढ झाली.

बॅंकेला ३ हजार १०२.२७ कोटींचा नफा झाला. यात २.२ टक्‍क्‍याची वाढ झाली. 

मुंबई - बुडीत कर्जांसाठी भरभक्कम तरतूद करावी लागल्याने आयसीआयसीआय बॅंकेच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत किरकोळ वाढ झाली.

बॅंकेला ३ हजार १०२.२७ कोटींचा नफा झाला. यात २.२ टक्‍क्‍याची वाढ झाली. 

३० सप्टेंबर रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत बॅंकेला बुडीत कर्जांसाठी ७ हजार ८२.६९ कोटींची तरतूद करावी लागली. बुडीत कर्जांमध्ये तब्बल ६५१.७५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली. गेल्या वर्षी याच तिमाहीत बॅंकेला बुडीत कर्जांसाठी ९४२.१६ कोटींची तरतूद करावी लागली होती. गेल्या वर्षी याच तिमाहीत बॅंकेला ३ हजार ३०.११ कोटींचा नफा झाला होता. त्याचबरोबर व्याजापोटी 
मिळणाऱ्या उत्पन्नातून ५ हजार २५३ कोटींचा महसूल मिळाला. इतर स्रोतांमधून ९ हजार ११९.६८ कोटींचे उत्पन्न मिळाल्याचे बॅंकेने म्हटले आहे.

Web Title: ICICI bank suffering from bad loans