'आयसीआयसीआय'ची सूत्रे संदीप बक्षी यांच्याकडे

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 19 जून 2018

मुंबई - आयसीआयसीआय बॅंकेची सूत्रे तूर्तास संदीप बक्षी यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय संचालक मंडळाने आज घेतला. बॅंकेचे मुख्य परिचालन अधिकारी म्हणून बक्षी यांची पाच वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणी बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांची चौकशी सुरू आहे. त्या सध्या रजेवर आहेत, त्यामुळे हा बदल करण्यात आला.

कोचर यांच्या भवितव्याबाबत बॅंकेच्या संचालक मंडळाची सोमवारी (ता.18) मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत बक्षी यांना संचालक मंडळावर घेण्याचा ठराव करण्यात आला. त्याचबरोबर त्यांना मुख्य परिचालन अधिकारी (सीओओ) म्हणून नियुक्‍त करण्यात आले. बक्षी 2010 पासून आयसीआयसीआय समूहातील विमा कंपनी असलेल्या आयसीआयसीआय प्रुडेंशिअल लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. बक्षी यांच्या कार्यकाळात प्रुडेंशिअल लाइफ इन्शुरन्स कंपनी आघाडीची विमा कंपनी म्हणून उदयास आली.

दरम्यान, बॅंकेच्या संचालक मंडळाने बक्षी यांच्या जागी एन. एस. कानन यांची प्रुडेंशिअल लाइफ इन्शुरन्सचे नवे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शिफारस केली आहे.

व्हिडिओकॉनला कर्ज देताना कुटुंबीयांना लाभ मिळवून दिल्याचा ठपका चंदा कोचर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी विविध तपास यंत्रणा चौकशी करत असून, बॅंकेनेही अंतर्गत चौकशी समिती स्थापन केली आहे. कोचर दीर्घ रजेवर असल्या तरी त्या बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारीपदी कायम असल्याचे बॅंकेने म्हटले आहे. त्या पुन्हा रुजू झाल्यानंतर बक्षी हे चंदा कोचर यांना "रिपोर्ट' करावे लागणार आहे.

Web Title: ICICI sandeep bakshi