गुंतवणुकीची संधी: 'आयसीआयसीआय सिक्‍युरिटीज'चा आयपीओ आजपासून खुला 

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 मार्च 2018

आयसीआयसीआय सिक्‍युरिटीज लि.ची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) आजपासून सुरु झाली. या "आयपीओ'साठी कंपनीने रु. 519 ते रु. 520 असा किंमतपट्टा जाहीर केला आहे. आजपासून (22 मार्च) खुला झालेला आयपीओसाठी येत्या 26 मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे.

पुणे:  आयसीआयसीआय सिक्‍युरिटीज लि.ची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) आजपासून सुरु झाली. या "आयपीओ'साठी कंपनीने रु. 519 ते रु. 520 असा किंमतपट्टा जाहीर केला आहे. आजपासून (22 मार्च) खुला झालेला आयपीओसाठी येत्या 26 मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे. गुंतवणूकदारांना किमान 28 आणि 28 शेअरच्या पटीत अर्ज करावा लागणार आहे. 

शेअर, म्युच्युअल फंड, कॉर्पोरेट एफडी, बॉंड्‌स, एनपीएस आदी गुंतवणूक क्षेत्रातील आघाडीची ब्रोकिंग कंपनी म्हणून आयसीआयसीआय सिक्‍युरिटीज प्रसिद्ध आहे. या इश्‍यूच्या माध्यमातून पाच रुपयांच्या दर्शनी मूल्याचे 7,72,49,508 शेअर विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार आहेत. या इश्‍यूद्वारे कंपनीची प्रवर्तक असलेली आयसीआयसीआय बॅंक आपल्याकडील हिस्सा विकणार आहे. यात आयसीआयसीआय बॅंकेच्या शेअरधारकांसाठी राखीव कोटा ठेवण्यात आला आहे. कंपनीच्या शेअरची मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदणी केली जाणार आहे. 

Web Title: ICICI Securities IPO opens today