‘आयडीबीआय’ने गृहकर्जाचा स्तर वाढविला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

मुंबई - आयडीबीआय बॅंकेने ‘प्रायोरिटी सेक्‍टर लेंडिंग’ योजनेअंतर्गत जास्तीत जास्त ग्राहकांना फायदा मिळावा यासाठी गृहकर्जाचा स्तर ३० लाखांवरून ३५ लाख केला आहे. यासाठी बॅंकेकडून ८.५ टक्के गृहकर्ज दर आकारला जाणार आहे. महिला कर्जदारांना गृहकर्जासाठी ०.०५ टक्के सवलत दिली जाणार आहे.

बॅंकेने वैयक्‍तिक आणि वाहन कर्जाचे व्याजदर आकर्षक केले आहेत. चांगला क्रेडिट स्कोअर असणाऱ्या ग्राहकांना किमान व्याजदरात कर्ज दिले जाईल, असे आयडीबीआयच्या किरकोळ बॅंकिंग विभागाचे कार्यकारी संचालक जॉर्टी चाको यांनी सांगितले.

Web Title: IDBI Home Loan