आयडिया ‘४जी’ची सेवा आता पुणे, नाशिकमध्ये!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

पुणे - आयडिया सेल्युलरने विविध सर्कलमध्ये ‘४जी’ नेटवर्क वाढविण्यास सुरवात केली आहे. कंपनीने आता ही सेवा पुणे आणि नाशिक या दोन शहरांत सुरू केली असून, नव्याने स्पेक्‍ट्रम मिळाल्यानंतर केवळ ४५ दिवसांच्या विक्रमी वेळेत ती सादर केली आहे.  

पुणे - आयडिया सेल्युलरने विविध सर्कलमध्ये ‘४जी’ नेटवर्क वाढविण्यास सुरवात केली आहे. कंपनीने आता ही सेवा पुणे आणि नाशिक या दोन शहरांत सुरू केली असून, नव्याने स्पेक्‍ट्रम मिळाल्यानंतर केवळ ४५ दिवसांच्या विक्रमी वेळेत ती सादर केली आहे.  

आयडिया सेल्यूलरचे चीफ कॉर्पोरेट अफेअर्स ऑफिसर रजत मुखर्जी म्हणाले, की आता एकतृतीयांश जनतेला वायरलेस ब्रॉडबॅंड सेवा उपलब्ध झाली आहे. ‘आयडिया’ने या वर्षीच्या प्रारंभी ‘४जी’ सेवेची सुरवात केली आणि सातत्याने वाढ करीत ४३० शहरांतील ३.३ कोटी ग्राहकांना ती उपलब्ध करून दिली आहे. अमरावती, औरंगाबाद, गोंदिया, कोल्हापूर, नागपूर, अलिबाग, वर्धा, जालना, वास्को, पणजी, मडगांव यांच्याबरोबरीने आता पुणे आणि नाशिकला जागतिक स्तरावरील ‘४जी’ सेवा उपलब्ध होईल. 

कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर राजेंद्र चौरासिया म्हणाले, की महाराष्ट्र आणि गोव्यात आपले वायरलेस ब्रॉडबॅंड अस्तित्व अधिक मजबूत करण्यासाठी ‘आयडिया सेल्युलर’ने नुकतेच मोठ्या प्रमाणावर एफडीडी आणि टीडीडी बॅंड्‌सचे स्पेक्‍ट्रम खरेदी केले आहेत. कंपनीने नेटवर्क सुविधांचे जाळे व ऑप्टिकल फायबर सुविधा अधिक चांगल्या करण्यासाठी तसेच त्यांची देखभाल करण्यासाठी मोठी गुंतवणूक केली आहे.  कंपनीने ‘४जी’ सेवांमध्ये वाढ करण्याबरोबरच आकर्षक डेटा पॅकही सुरू केले असून, यांची सुरवात रु. ४७ पासून होत आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर डिजिटल कंटेंटसुद्धा ग्राहकांच्या इन्फोटेन्मेंट गरजा पूर्ण करणार आहे. आघाडीच्या स्मार्टफोन कंपन्यांबरोबर सहकार्य करून ‘४जी’ ग्राहकांसाठी काही आकर्षक ऑफरही उपलब्ध करून दिल्या आहेत, असे त्यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Idea 4g service now in Pune, Nashik!