बाजारात ‘आयडिया’ला मागणी कायम

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 जानेवारी 2017

मुंबई: व्होडाफोन इंडियाने विलनीकरणासंबधी प्रस्ताव सादर केल्यानंतर आयडियाच्या शेअरला वाढलेली मागणी आज(मंगळवार) कायम आहे. आज इंट्राडे व्यवहारात कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 12 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. काल दिवसभरात 30 टक्‍क्‍यांची उसळी घेणार आयडिया सेल्यूलर अखेर 25.90 टक्‍क्‍यांच्या वाढीसह बंद झाला होता.

दूरसंचार जगतातील प्रमुख कंपनी व्होडाफोनची आदित्य बिर्ला समूहाच्या आयडिया सेल्युलर कंपनीमध्ये विलीनीकरणासंबंधी चर्चा सुरू आहे. याबाबत व्होडाफोन कंपनीच्या सूत्रांनी माहिती दिली. भारतामध्ये एअरटेल व रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी दूरसंचार क्षेत्रामध्ये आपले वर्चस्व वाढवण्याचा व्होडाफोन व आयडिया सेल्यूलर कंपन्यांनी निर्धार केला आहे.

मुंबई शेअर बाजारात कंपनीचा शेअर 101 रुपयांवर उघडला. त्यानंतर शेअरने 97.95 रुपयांवर दिवसभराची नीचांकी तर 111.70 रुपयांवर दिवसभराची उच्चांकी पातळी गाठली. सध्या(11 वाजून 48 मिनिटे) कंपनीचा शेअर 111.25 रुपयांवर उघडला असून 13.58 टक्क्यांनी वधारला आहे.

Web Title: idea company market demand continue