'जिओ'शी स्पर्धा करण्यासाठी नवी 'आयडिया'

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 एप्रिल 2017

मुंबई : मोफत कॉल आणि मोफत डेटाची खैरात ग्राहकांना देणाऱ्या रिलायन्स जिओशी स्पर्धा करण्यासाठी आता आयडियाने नवी योजना सादर केली आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी 348 रुपयांच्या योजना बदलून आता 300 रुपयांचा नवा योजना आणली आहे. त्यामुळे आता 300 रुपयांत आयडिया ग्राहकांना अमर्याद स्थानिक, तसेच एसटीडी कॉलिंग आणि 4 जी डेटा दररोज 1 जीबी दिला जाणार आहे.

पोस्टपेडचे जे ग्राहक 199 रु. किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीची योजना वापरत असतील त्यांना ही नवी योजना घेता येईल. आयडियाचे जे ग्राहक 499 रुपये किंवा त्याच्या वरची योजना वापरत असल्यास त्यांना ही ऑफर एक महिन्यासाठी फ्री मिळणार आहे. तर 349 आणि 499 रुपयांमधील योजना वापरणाऱ्या यूजर्सला ही ऑफर डिस्काउंट प्राइज म्हणजेच 50 रु. दर महिन्याला याप्रमाणे तीन महिनपर्यंत ही ऑफर मिळू शकते.

जे ग्राहक 199 चे 349 रुपयांचा योजना वापरतात त्यांना ही ऑफर प्रत्येक महिन्याला 200 रुपये देऊन तीन महिन्यापर्यंत मिळू शकते. तीन महिन्यानंतर 1 जीबी डेटा आणि मोफत अमर्याद कॉलिंगसाठी 300 रुपये द्यावे लागणार आहेत. या ऑफरसाठी यूजर्सला 30 एप्रिलपर्यंत हा योजना सब्सक्राइब करावी लागणार आहे, असे कंपनीनं स्पष्ट केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: idea launches new tariff plan to compete jio