‘आयडिया’चा शेअर 12 टक्के तेजीत का?

वृत्तसंस्था
बुधवार, 15 मार्च 2017

मुंबई: दूरसंचार कंपनी आयडिया सेल्युलरच्या शेअरमध्ये आज(बुधवार) इंट्राडे व्यवहारात 12 टक्क्यांची वाढ झाली आहे. अमेरिकन टॉवर कॉर्पोरेशन अर्थात 'एटीसी'ने कंपनीच्या टॉवर व्यवसायाच्या खरेदी व्यवहाराला अंतिम स्वरुप देण्याची तयारी सुरु केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये तेजी निर्माण झाली आहे. या कराराअंतर्गत आयडियाचा टॉवर व्यवसाय एटीसीच्या भारतीय पोर्टफोलिओसोबत विलीन होण्याची शक्यता आहे. व्होडाफोनमध्ये विलीन होण्यापुर्वी हा करार पुर्ण करण्यास आयडिया इच्छुक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आयडियाने व्होडाफोनसोबत विलीनीकरणाच्या बातमीला दुजोरा दिल्यानंतर कंपनीच्या शेअरच्या कामगिरीत सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये कंपनीच्या शेअरमध्ये सुमारे 45 टक्क्यांची वाढ झाली आहे.

मुंबई शेअर बाजारात आयडियाचा शेअर आज(बुधवार) 103.05 रुपयांवर उघडला. त्यानंतर, शेअरने 103 रुपयांवर दिवसभराची नीचांकी तर 115.50 रुपयांवर दिवसभराची उच्चांकी पातळी गाठली. सध्या(11 वाजून 42 मिनिटे) कंपनीचा शेअर 112.30 रुपयांवर व्यवहार करत असून 8.98 टक्क्यांनी वधारला आहे.

Web Title: idea share12% up now