आयडिया-व्होडाफोनच्या विलिनीकरणाला शेअरधारकांची मंजुरी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

दोन्ही दूरसंचार कंपन्यांनी विलिनीकरणा नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (एनसीएलटी) परवानगी घेतली आहे. आता दोन्ही कंपन्यांना दूरसंचार विभागाकडून अंतिम मंजुरीची आवश्यकता असेल. व्होडाफोनला भारतातून महसुली उत्पन्न तुलनेत कमी मिळते. परिणामी ब्रिटनस्थित व्होडाफोनने भारतातील दूरसंचार व्यवसाय विकण्याचे पाऊल उचलले होते. त्यासाठी अखेर आयडिया सेल्युलरची निवड करण्यात आली होती

मुंबई: आयडिया आणि व्होडाफोनच्या विलिनीकरणाला आयडिया सेल्युलरच्या शेअरधारकांनी मंजुरी दिली. काल (ता.12 आॅक्टोबर) झालेल्या आयडिया सेल्युलरच्या शेअरधारकांच्या बैठकीत 99 टक्के शेअरधारकांनी विलीनीकरणास मंजुरी दिली आहे, अशी माहिती आदित्य बिर्ला समूहाकडून शेअर बाजाराला कळविण्यास आली आहे.

आयडिया आणि व्होडाफोनच्या विलिनीकरणाला शेअरधारकांनी मंजुरी दिल्यानंतर आज (शुक्रवार) मुंबई शेअर बाजारात आयडिया सेल्युलरचा शेअर 6 टक्क्यांनी वधारला होता. शेअरने आज इंट्राडे व्यवहारात 80.50 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली. अखेर शेअर 78.90 रुपयांवर व्यवहार करत 4.40 रुपयांनी म्हणजेच 5.91 टक्क्यांनी वधारून बंद झाला.

दोन्ही दूरसंचार कंपन्यांनी विलिनीकरणा नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (एनसीएलटी) परवानगी घेतली आहे. आता दोन्ही कंपन्यांना दूरसंचार विभागाकडून अंतिम मंजुरीची आवश्यकता असेल.

व्होडाफोनला भारतातून महसुली उत्पन्न तुलनेत कमी मिळते. परिणामी ब्रिटनस्थित व्होडाफोनने भारतातील दूरसंचार व्यवसाय विकण्याचे पाऊल उचलले होते. त्यासाठी अखेर आयडिया सेल्युलरची निवड करण्यात आली होती.

Web Title: idea vodaphone share