‘मायक्रोसॉफ्ट’कडून वार्षिक एक कोटी १७ लाखांचे पॅकेज

वृत्तसंस्था
सोमवार, 2 डिसेंबर 2019

मुंबई - आयआयटी-मुंबईत कॅम्पस प्लेसमेंटला सुरुवात झाली असून, एका विद्यार्थ्याला मायक्रोसॉफ्टकडून वार्षिक एक कोटी १७ लाख रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. आयआयटी-मुंबईतील कॅम्पस प्लेसमेंटच्या पहिल्या टप्प्यात एकूण १८ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यात काही आंतरराष्ट्रीय कंपन्यांचाही समावेश होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

यंदा सर्वाधिक पॅकेज मायक्रोसॉफ्टकडून देण्यात आले आहे. त्यापाठोपाठ ‘ऑप्टिव्हर’ आणि ‘उबर’कडून वार्षिक एक कोटी दोन लाख रुपयांचे पॅकेज देऊ करण्यात आले आहे. मायक्रोसॉफ्टकडून मागील वर्षी एक कोटी १४ लाख रुपयांचे पॅकेज दिले होते. क्वालकॉमने ३२.५९ लाख रुपयांचे, तर ‘गुगल’कडून वार्षिक ३२ लाख रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. आज झालेल्या प्लेसमेंटमध्ये आयटी, मूलभूत अभियांत्रिकीसह फायनान्स आणि कन्सल्टिंग या क्षेत्रांमधील नोकऱ्यांसाठी मोठ्या पगाराच्या नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. कॅम्पस प्लेसमेंटच्या पहिल्या टप्प्यात ११० विद्यार्थ्यांची नोकरी पक्की झाली आहे.

"मोदी 2.0'ची दमदार कामगिरी 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IIT-Bombay placements: Microsoft, Uber offer Rs 1crore