‘आयएल अँड एफएस’ समूहातील कंपन्यांच्या दिवाळखोरीला स्थगिती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

मुंबई - आर्थिक संकटात सापडलेल्या ‘आयएल अँड एफएस’ समूहातील कंपन्यांच्या दिवाळखोरीविषयक प्रक्रियेला राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने (एनसीएलटी) स्थगिती दिली. यामुळे ‘आयएल अँड एफएस’ला दिलासा मिळाला असून, लवादाच्या निर्णयाचे केंद्र सरकारने स्वागत केले आहे.

आयएल अँड एफएस समूहातील काही कंपन्यांविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर कंपनी कायदा लवादाच्या मुंबई खंडपीठापुढे सोमवारी (ता.१५) तातडीने सुनावणी झाली. मोठ्या कर्जांची फेड करण्याऐवजी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि रखडलेले प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याची कंपनीची प्राथमिकता असल्याने तूर्त दिवाळखोरीविषयक प्रक्रियेला स्थगिती देण्याचा निर्णय खंडपीठाने जाहीर केला. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने खंडपीठाने योग्य निर्णय दिल्याचे कंपनी व्यवहार सचिव इंजेती श्रीनिवास यांनी सांगितले. कंपनीकडील पैसा कर्जफेडीसाठी वापरल्यास अडचणी आणखी वाढतील. त्यामुळे खंडपीठाकडून आणखी काहीवेळ हवा होता जो मिळाला, असेही त्यांनी नमूद केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IL and FS Group Company Issue