नोटाबंदीच्या अंमलबजावणीची अधिकारी करणार पाहणी

वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

दोन अधिकाऱ्यांचा गट तेलंगण, केरळ, हरियाना, छत्तीसगड, झारखंड, गोवा आणि आसाम या राज्यांना भेट देईल. नागालॅंड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, अंदमान व निकोबार बेटे, लक्षद्वीप, पद्दुचेरी आणि सिक्कीम येथे प्रत्येकी एक अधिकारी भेट देईल.

नवी दिल्ली : केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी नोटाबंदी मोहिमेचे मूल्यमापन करण्यासाठी राज्यांना भेट देणार असून, केंद्राला याबाबत अहवाल सादर करणार आहेत.

केंद्र सरकारमधील अतिरिक्त सचिव व सहसचिव दर्जाच्या सुमारे 70 अधिकाऱ्यांच्या 32 गट करण्यात आले आहेत. हे वेगवेगळ्या राज्यांनी भेट देऊन नोटाबंदीची अंमलबजावणी तपासणार आहेत. प्रत्यक्ष पाहणी करून हे अधिकारी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. यानंतर ते सरकारला अहवाल सादर करतील. हे अधिकारी केंद्र सरकारमधील वेगवेगळ्या विभागांतील आहेत. या भेटीच्या वेळा आर्थिक कामकाज विभाग ठरविणार आहे.

प्रत्येकी तीन अधिकाऱ्यांचा गट गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र, पश्‍चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, ओडिशा, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्‍मीर या राज्यांना भेट देईल. दोन अधिकाऱ्यांचा गट तेलंगण, केरळ, हरियाना, छत्तीसगड, झारखंड, गोवा आणि आसाम या राज्यांना भेट देईल. नागालॅंड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, अंदमान व निकोबार बेटे, लक्षद्वीप, पद्दुचेरी आणि सिक्कीम येथे प्रत्येकी एक अधिकारी भेट देईल.

Web Title: implementation of currency ban to be supervised