‘रिलायन्स’ने ‘५ जी’ तंत्रज्ञानासह केल्या महत्वाच्या घोषणा; वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 July 2020

शेअरभावात घसरण 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सभेच्या प्रारंभीच्या काळात कंपनीचा शेअर तेजीत दिसून आला. पण त्यानंतर त्यात विक्रीच्या माध्यमातून नफावसुली झाल्याचे दिसून आले. मुंबई शेअर बाजारात मंगळवारच्या भावाच्या तुलनेत त्यात ७३ रुपयांची घसरण होऊन तो १८४४ रुपयांवर स्थिरावला. त्याआधी म्हणजे सोमवारी त्याने १९४७ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती.

मुंबई - लॉकडाउनच्या काळातही चर्चेत राहिलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या बहुचर्चित वार्षिक सर्वसाधारण सभेत आज ‘५ जी’ तंत्रज्ञानासह ‘जिओ’ प्लॅटफॉर्मवर अनेक नवे डिजिटल उपक्रम जाहीर करून ‘कर लो डिजिटल दुनिया मुठ्ठी में’ हाच संदेश नकळतपणे दिला. जिओ प्लॅटफॉर्ममध्ये आता ‘गुगल’नेही ३३,७३७ कोटी रुपयांची (७.७ टक्के हिस्सा) गुंतवणूक केल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘कोविड-१९’च्या साथीमुळे यंदा प्रथमच ‘रिलायन्स’ची वार्षिक सर्वसाधारण सभा व्हर्च्युअल स्वरूपात झाली. या ऐतिहासिक सभेत नव्या तंत्रज्ञानाचा केलेला वापर लक्षवेधक होता. विविध ५०० ठिकाणच्या शेअरधारकांना त्यांना सहभागी होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी, त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्यासह त्यांची मुले व किरण थॉमस यावेळी उपस्थित होते.

Image may contain: text that says "Jio जी' महत्त्वाच्या घोषणा जिओ मुळे ऑनलाईन डीचेनवे पूर्णपणे देशातच तंत्रज्ञान मिळताच अंदाजे पुढील अंमलवजावणी आधुनिक जिओ टीव्ही घोषणा प्रत्यक्ष मिळणार. व्हॉट्सॲप' एकत्रितपणे याक्लाउड व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्मला आतापयंत वापरकरत्यांनी डाठनलोड केले आहे. डेव्हलपर्स प्रोगामच्या माध्यमातून ॲप विकसित करणाऱ्यांसाठी संधी प्लॅटफॉर्म, चित्रपट, शो, विविध आणि इतर देणार अँडॉईड आणि ग्राहकांसाठी 'जिओ मार्ट' कार्यरत २०० वॉक्सवरील आधारित भारत करण्याचा शहरांमध्ये फ्लॅटफॉर्म प्रारंभीची ग्राहकांना पहिल्या ऑर्डर समवेत कोविड- १९ सुरक्षा किट मनोरंजन, आरोग्य, पाककला, योग, इतर अनेक विषयांवरील अप्लिकेशन उपलब्ध होणार बैठकीत सहभाग ४१ देश ४६० शहरे ३.१ लाखांहून अधिक नागरिक"

जिओ प्लॅटफॉर्मबरोबरच, ‘जिओ मार्ट’च्या रुपाने ‘रिलायन्स’ आता रिटेल क्षेत्रातही आघाडी घेणार असल्याचे या सभेतील सादरीकरणावरून दिसून आले.

शेअरभावात घसरण 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सभेच्या प्रारंभीच्या काळात कंपनीचा शेअर तेजीत दिसून आला. पण त्यानंतर त्यात विक्रीच्या माध्यमातून नफावसुली झाल्याचे दिसून आले. मुंबई शेअर बाजारात मंगळवारच्या भावाच्या तुलनेत त्यात ७३ रुपयांची घसरण होऊन तो १८४४ रुपयांवर स्थिरावला. त्याआधी म्हणजे सोमवारी त्याने १९४७ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important announcements made by Reliance with 5G technology