'स्वच्छ भारत'साठी IT विभागाकडून 1 दिवसाचा पगार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 मार्च 2017

या संघटनांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांच्याकडे हा निधीचा धनादेश सुपुर्द केला.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'स्वच्छ भारत' मोहिमेसाठी प्राप्तिकर विभागातील (IT) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन दिले आहे.

इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस असोसिएशन, इन्कम टॅक्‍स गॅझेटेड ऑफिसर्स असोसिएशन आणि इन्कम टॅक्‍स एम्प्लॉईज असोसिएशन या तीन संघटनांनी 52 लाख 75 हजार 183 रुपये 'स्वच्छ भारत मिशन'साठी दिले आहे.

या संघटनांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांच्याकडे हा निधीचा धनादेश सुपुर्द केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छतेच्या नाऱ्यानंतर प्राप्तिकर विभागातील या संघटनांनी देशभरातील कार्यालये स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आता यापुढील पाऊल म्हणून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत त्यांनी एक दिवसाचे वेतन देऊन आणखी सहभाग नोंदविला आहे.

Web Title: income tax dept gives one day pay for swachh bharat