मागील काही दिवसांत त्यात झालेल्या नफावसुलीने सोन्याचा भाव पाच महिन्यांच्या नीचांकी स्तरावर आला होता. आता पुन्हा त्यात दर वाढ होऊ लागली आहे असे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे. मागील तीन दिवसांत चांदी ३ हजार ५०० रुपये तर सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम एक हजार रुपयांची वाढ झालेली आहे.
नागपूर : कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीची मागणी कायम आहे. त्यामुळे या दोन्ही मौल्यवान धातूंची मागणी वाढली असून, किमतीत वाढ झाली आहे. सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४९ हजार ९०० रुपये आहे. त्यात २०० रुपयांची वाढ झाली तर एक किलो चांदीचा भाव ६४ हजार ५०० रुपये आहे. त्यात ५०० रुपयांची वाढ झाली आहे.
गेल्या पाच दिवसांपासून सोने आणि चांदीमध्ये तेजी दिसून आली आहे. अनलॉकअंतर्गत सरकारने विवाह सोहळ्याला शंभर लोकांच्या उपस्थितीला मान्यता दिली आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने सराफ व्यावसायिकांकडून सोन्याची खरेदी वाढली असल्याचे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे. सोने-चांदीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळू लागला होता. त्यात खरेदी वाढताच पुन्हा भाव वाढले.
कोरोना प्रतिबंधात्मक लशीबाबत सकारात्मक घडामोडी घडत आहेत. यामुळे युरोपातील कोरोनाची साथ आटोक्यात येण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. त्यांनी सोन्यातील गुंतवणूक कमी करून हा ओघ भांडवली बाजारात वळवला आहे.
मागील काही दिवसांत त्यात झालेल्या नफावसुलीने सोन्याचा भाव पाच महिन्यांच्या नीचांकी स्तरावर आला होता. आता पुन्हा त्यात दर वाढ होऊ लागली आहे असे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे. मागील तीन दिवसांत चांदी ३ हजार ५०० रुपये तर सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम एक हजार रुपयांची वाढ झालेली आहे.
चांदीचे भाव
संपादन - नीलेश डाखोरे