अल्पबचत योजनांच्या व्याजदरात वाढ

पीटीआय
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली - केंद्र सरकारने अल्पबचत योजनांच्या व्याजदरात ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी ०.४ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ केली आहे. बॅंकांकडून व्याजदरात होत असलेल्या वाढीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने हे पाऊल उचलले आहे. 

अल्पबचत योजनांवरील व्याजदराचा तिमाही आढावा घेण्यात येतो. चालू आर्थिक वर्षातील ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांच्या व्याजदरात ०.४ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पाच वर्षे मुदत ठेव, रिकरिंग खाते, ज्येष्ठ नागरिक बचत योजना यांचे नवे व्याजदर अनुक्रमे ७.८, ७.३ आणि ८.७ टक्के असतील. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर तिमाही व्याज देण्यात येते. 

बचत ठेवींवरील वार्षिक व्याजदर ४ टक्‍क्‍यांवर कायम ठेवण्यात आला आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) आणि राष्ट्रीय बचत पत्र (एनएससी) यांच्या व्याजदर ७.६ टक्‍क्‍यांवरून ८ टक्के करण्यात आला आहे. किसान विकास पत्राचा व्याजदर ७.७ टक्के करण्यात आला असून, त्याची मुदत ११८ महिन्यांवरुन ११२ महिन्यांवर आणण्यात आली आहे. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर नवा ८.५ टक्के असेल. एक ते तीन वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर ०.३ टक्‍क्‍याने वाढविण्यात आला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in interest rates for small savings schemes