esakal | Share Market: दिवसाच्या सुरुवातीलाच सेन्सेक्समध्ये वाढ; वॉलस्ट्रीटसोबत आशियाई बाजारात तेजीचे वारे
sakal

बोलून बातमी शोधा

share market

अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प कोरोनातून बरे होऊन व्हाईट हाऊसला परतल्यापासून जागतिक भांडवल बाजारावर त्याचा मोठा परिणाम दिसला आहे.

Share Market: दिवसाच्या सुरुवातीलाच सेन्सेक्समध्ये वाढ; वॉलस्ट्रीटसोबत आशियाई बाजारात तेजीचे वारे

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प कोरोनातून बरे होऊन व्हाईट हाऊसला परतल्यापासून जागतिक भांडवल बाजारावर त्याचा मोठा परिणाम दिसला आहे. आज सेन्सेक्सची दिवसाची सुरुवातीलाच 11.84 अंशांनी वाढू झाली. या वाढीमुळे सेन्सेक्स (Sensex) 39,586.41 वर गेला आहे. 
 
मागील सत्रात सेन्सेक्स तब्बल 600.87 अशांनी वाढला होता. त्याचबरोबर निफ्टी निर्देशांकातही 159.05 अंशांनी वाढ होऊन 11,662.40 या पातळीवर विसावला होता.

उपचारांना चांगला प्रतिसाद देणाऱ्या ट्रम्प यांच्या आरोग्याबद्दलच्या सकारात्मक बातम्यांमुळे वॉलस्ट्रीटसोबत आशियाई बाजारात मंगळवारी तेजीचे चित्र दिसून आले होते. अमेरिकेत सरकारच्या प्रोत्साहन पॅकेजच्या आशावादाने भांडवली बाजारातील सकारात्मक भावनांना आणखीन चांगली चालना मिळत आहे.  

रिजर्व बॅंकेची पतधोरणाची द्विमासिक बैठक लांबणीवर गेली आता ती आजपासून सुरु होत आहे. एमपीसीवर सरकारकडून सोमवारी रात्री तीन सदस्यांना नियुक्त केले आहे. त्यामध्ये जयंत वर्मा, अशिमा गोयल आणि शशांक भिडेंचा सामावेश आहे.