"इंडेक्‍स फंडा'कडे वळण्याची हीच वेळ आहे का? 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

म्युच्युअल फंडचे पुनर्वर्गीकरणाच्या 'सेबी'च्या योजनेने भारतात"इंडेक्‍स फंड'ची लोकप्रियता वाढण्यास हातभार लावला आहे.विकसित देशांमध्ये"इंडेक्‍स फंड' नेहमीच लोकप्रिय राहिले आहेत.

सध्या वारंवार एका मुद्द्यावर चर्चा होताना दिसते, तो म्हणजे म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी त्यांच्या प्रत्यक्षपणे व्यवस्थापन होणाऱ्या म्हणजेच "ऍक्‍टिव्ह फंडा"पासून अप्रत्यक्षपणे व्यवस्थापन होणाऱ्या "पॅसिव्ह इंडेक्‍स फंडा"कडे वळण्याची हीच वेळ आहे का? यावर चर्चा होण्यास कारणही असेच आहे. गेल्या वर्षी प्रत्यक्ष व्यवस्थापन होणारे बहुतांश "लार्ज कॅप फंड" निर्देशांकापेक्षा चांगली कामगिरी करण्यास अपयशी ठरले. निफ्टीने गेल्या काही वर्षांत काही "लार्ज कॅप फंड"पेक्षा जास्त परतावा दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

म्युच्युअल फंडचे पुनर्वर्गीकरणाच्या 'सेबी'च्या योजनेने भारतात "इंडेक्‍स फंड'ची लोकप्रियता वाढण्यास हातभार लावला आहे. विकसित देशांमध्ये "इंडेक्‍स फंड' नेहमीच लोकप्रिय राहिले आहेत. 

"इंडेक्‍स फंड' विरुद्ध "ऍक्‍टिव्ह फंड' यातील नेमका फरक काय? 
"इंडेक्‍स फंड'मध्ये व्यवस्थापन कमी खर्चिक असते आणि यात कोणतेही प्रत्यक्ष फंड व्यवस्थापन नसते यामुळे प्रत्यक्ष व्यवस्थापन होणाऱ्या फंडाच्या तुलनेत खर्चाचे प्रमाणही एकूणच कमी असते. याचबरोबर हे फंड मानवी पक्षपातीपणापासून दूर असतात, कारण ते निर्देशांकावर आधारित असतात. आता हळूहळू "इंडेक्‍स फंडा'कडे कल वाढू लागला आहे. 

आणखी बातम्या व बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुनर्वर्गीकरणानंतर नेमका कशाप्रकारे बदल झाला आहे? 
इतिहास पाहिल्यास नेहमीच "मिड कॅप" आणि "मल्टीकॅप फंड"ची कामगिरी "इंडेक्‍स फंड'पेक्षा चांगली राहिली आहे. गेल्या काही काळात (कोरोनाच्या संकटाच्या आधीचा काळ) या प्रकारच्या फंडांनी नकारात्मक परतावा दिला आहे. एवढेच काय काही "लार्ज कॅप फंडां'नीही "इंडेक्‍स फंडा'पेक्षा कमी परतावा दिला आहे. पुनर्वर्गीकरणानंतर काही काळ "लार्ज कॅप फंडां'ना "इंडेक्‍स फंडां'पेक्षा चांगली कामगिरी करणे आव्हानात्मक ठरेल. आता "लार्ज कॅप फंडा'च्या व्यवस्थापकाला टॉप 100 कंपन्यांतील स्टॉक्‍स खरेदी करावे लागतील. त्याला "ट्रू टू लेबल' ही विचारसरणी अनुसरावी लागेल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

आता पूर्णपणे "इंडेक्‍स फंड'कडे वळून "ऍक्‍टिव्ह फंड' सोडून द्यावेत का? 
नाही, मला वाटते की प्रत्यक्ष व्यवस्थापन होणाऱ्या फंडांकडे दुर्लक्ष करण्याची वेळ अद्याप आलेली नाही आणि पूर्णपणे प्रत्यक्षपणे व्यवस्थापन न होणाऱ्या फंडांकडे जाण्याचीही वेळ आलेली नाही. याचे कारण आहे, पॅसिव्ह इंडेक्‍स फंडापेक्षा अधिक चांगला परतावा मिळवून देण्यासाठी "ऍक्‍टिव्ह फंड मॅनेजर' हा कायम प्रयत्नशील असतो. याचबरोबर "ऍक्‍टिव्ह फंड मॅनेजर' निर्देशांकापेक्षा नेहमीच अधिक परतावा मिळवून देण्यावर भर देत असतो. यात आणखी एक महत्वाची बाब म्हणजे आपला बाजार आणि अर्थव्यवस्था हे अद्याप विकसनशील पातळीवर आहेत आणि सर्वसामान्यपणे गुंतवणूकदार त्यांची तुलना अमेरिकेसारख्या विकसित बाजाराशी करण्याची चूक करतात. अमेरिकेतील शेअर बाजार आणि इतर विकसित देशातील बाजार हे परिपक्व झालेले आहेत आणि तेथे तुमच्या पोर्टफोलिओतील मोठा हिस्सा "इंडेक्‍स फंड"मध्ये गुंतविणे शहाणपणाचे ठरते. परंतु, भारतीय शेअर बाजाराचा विचार करता त्याने अद्याप ही परिपक्वतेची पातळी गाठलेली नाही. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे बाजाराचे भांडवलीमूल्य विकसित बाजारांपेक्षा खूप कमी आहे. याचमुळे "ऍक्‍टिव्ह फंड मॅनेजर'ला "इंडेक्‍स फंडा'पेक्षा अधिक चांगला परतावा मिळवून देण्याची संधी मिळते. 

Image may contain: one or more people, glasses and text

"पॅसिव्ह इंडेक्‍स फंड'पेक्षा चांगली कामगिरी करणारे गुणात्मक स्टॉक्‍स निवडण्यासाठी "ऍक्‍टिव्ह म्युच्युअल फंड मॅनेजर'ला ही लवचिकताच मदत करते. जोपर्यंत फंड मॅनेजर चांगला परतावा मिळवतो, तोपर्यंत तो "इंडेक्‍स फंड'ना टक्कर देऊ शकतो. कारण "इंडेक्‍स फंड' हे निर्देशांकांचे प्रतिबिंब असतात आणि त्या पलिकडे परतावा मिळवून देणे त्यांना शक्‍य नसते. 

1- तुमच्या पोर्टफोलिओतील 20 ते 25 टक्के हळू "इंडेक्‍स फंडा'कडे वळवा. कारण बाजारात वाढत्या जागरुकतेमुळे टॉप 100 कंपन्यांमध्ये "इंडेक्‍स फंडा'च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा येणार आहे. त्यामुळे सध्याचे फंड चालू ठेवण्याचा आणि पुढे सर्व काही ठीक होईल, हा कोणत्याही तज्ज्ञांचा सल्ला ऐकू नका. तुम्हाला टीव्हीवर अनेक तज्ज्ञ सापडतील जे बाजार तात्पुरता अस्थिर असून पुढे सर्व काही ठीक होईल, असे सांगताना दिसतात. कारण प्रत्येकालाच माहिती असते की दीर्घकाळात सर्व काही ठीक होईल परंतु, "ऍसेट ऍलोकेशन'शी निगडित तातडीचे निर्णय वेळीच न घेतल्यास दीर्घकाळात काही ठीक होऊ शकणार नाही. "ऍसेट ऍलोकेशन' म्हणजे केवळ वेगवेगळ्या "ऍसेट क्‍लास'मध्ये गुंतवणूक करणे नव्हे, तर तुम्ही भविष्यात चांगली कामगिरी करणाऱ्या "ऍसेट क्‍लास'मध्ये वेळीच पैसा वळवणे असा याचा अर्थ होतो. 

2- तुम्ही तुमच्या जोखीम प्रोफाइलशी जुळणारे चांगले इंडेक्‍स फंड निवडा आणि चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होणाऱ्या "ऍक्‍टिव्ह फंड'मध्ये गुंतवणूक करणे कायम ठेवा. निर्देशांकातील आघाडीच्या कंपन्यांपेक्षा मागील काही वर्षात चांगली कामगिरी न केलेले परंतु, भविष्यात चांगली कामगिरी करण्याची क्षमता असलेले काही "लार्ज आणि मल्टीकॅप फंड" निवडा. यातूनच तुम्ही चांगला परतावा देणारे फंड एकत्रित करून समीकरण जुळवू शकाल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Index funds are less costly to manage and have no direct fund management