भारत जगातील ६ वी मोठी अर्थव्यवस्था

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जुलै 2018

पॅरिस - जागतिक बॅंकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारताने फ्रान्सला मागे टाकत जगातील सहावी सर्वांत मोठी अर्थव्यव्यवस्था होण्याचा मान पटकविला आहे. या यादीत अमेरिकेने आपले अव्वल स्थान कायम राखल्याचेही स्पष्ट झाले आहे.

वर्ष २०१७ च्या अखेरीस भारताचे एकूण देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी) २.५९ ट्रिलियन डॉलर होते. तिथेच फ्रान्सचे उत्पन्न २.५८ ट्रिलियन डॉलर राहिल्याचे जागतिक बॅंकेने आपल्या अहवालात म्हटले आहे. भारताची लोकसंख्या १ अब्ज ३४ कोटी असून, फ्रान्सची ६ कोटी ७० लाख आहे. ही तफावत पाहता दरडोई उत्पन्नात भारत अद्याप फ्रान्सच्या अनेकपटीने मागे असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. नोटाबंदीनंतर काही तिमाहींमध्ये विकासदरात सातत्याने घसरण होत होती. मात्र, उत्पादन आणि ग्राहकांची क्रयशक्ती यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळाली. ‘जीएसटी’च्या अंमलबजावणीनंतर म्हणजेच जुलै २०१७ पासून त्यात उल्लेखनीय वाढ झाल्याचे जागतिक बॅंकेच्या अहवालात म्हटले आहे. 

आगामी काळात चीनच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावण्याची शक्यता असून भारत चीनला मागे टाकून आशियातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

Web Title: India is the 6th largest economy in the world