कोणाच्या तिजोरीत किती सोने? बघा 

वृत्तसंस्था
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

जगातील सर्वाधिक सोन्याचा साठा ज्या देशांच्या तिजोरीत आहे अशा 10 देशांची यादी

नवी दिल्ली: जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी येण्याच्या शक्यतेने सोन्याच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. जगातील सर्वच देश आपल्या तिजोरीत सोन्याचा साठा करून ठेवत आहेत. एरवीसुद्धा सर्व देशांच्या केंद्रिय बॅंकांकडे आपतकालीन निधी म्हणून आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यवहारांची गरज म्हणून परकी चलनासोबतच सोन्याचा साठा असतो. जून 2019 अखेर जगातील सर्वाधिक सोन्याचा साठा ज्या देशांच्या तिजोरीत आहे अशा 10 देशांची यादी पुढील प्रमाणे आहे. यात अमेरिका क्रमांक एकवर असून नेदरलॅंड्स दहाव्या क्रमांकावर आहे. तर भारताचा क्रमांक 9वा आहे.

1. अमेरिका (सोन्याचा साठा : 8133.53 मेट्रिक टन)
2. जर्मनी (सोन्याचा साठा : 3367.95 मेट्रिक टन)
3. इटली (सोन्याचा साठा : 2451.85 मेट्रिक टन)
4. फ्रान्स (सोन्याचा साठा : 2436.06 मेट्रिक टन)
5. रशिया (सोन्याचा साठा : 2207.01 मेट्रिक टन)
6. चीन (सोन्याचा साठा : 1916.29 मेट्रिक टन)
7. स्वित्झरलॅंड (सोन्याचा साठा : 1040.01 मेट्रिक टन)
8. जपान (सोन्याचा साठा : 765.22 मेट्रिक टन)
9. भारत (सोन्याचा साठा : 618.17 मेट्रिक टन)
10. नेदरलॅंड्स (सोन्याचा साठा : 612.46 मेट्रिक टन)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India among top 10 nations in gold reserves