देशाची निर्यात ‘सरप्लस’मध्ये

पीटीआय
Tuesday, 4 August 2020

कोरोनाच्या संसर्गाचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील गंभीर परिणाम होऊ लागले आहेत, एकीकडे यामुळे रोजगाराच्या संधी कमी होत चालल्या असताना दुसरीकडे आयात-निर्यात व्यापारावर देखील त्याचा परिणाम होताना दिसतो आहे. मात्र आयात आणि निर्यातीच्या आघाडीवर मात्र दिलासादायक बातमी आहे.

नवी दिल्ली - कोरोनाच्या संसर्गाचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील गंभीर परिणाम होऊ लागले आहेत, एकीकडे यामुळे रोजगाराच्या संधी कमी होत चालल्या असताना दुसरीकडे आयात-निर्यात व्यापारावर देखील त्याचा परिणाम होताना दिसतो आहे. मात्र आयात आणि निर्यातीच्या आघाडीवर मात्र दिलासादायक बातमी आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मागील अठरा वर्षांच्या काळामध्ये प्रथमच या व्यापारामध्ये देशाच्या हाती मोठी शिल्लक राहिली आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाची बदलेली गणिते, जागतिक स्तरावर घटलेली मागणी यामुळे पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाली आहे. पुढील काही तिमाहींमध्ये आयात आणि निर्यात व्यापारामध्ये असमतोल कायम राहण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.

Image may contain: text that says "७९० दशलक्ष डॉलर महिन्यातील आयातीपेक्षा जास्त झालेली निर्यात १८ वर्षांतील ४७.५९ टक्के आयातीत झालेली (२१.११ डॉलर) १२. १२.४१ टक्क्यांपर्यंत निर्यातीमधील घट (२१.९१ कालावधी-ज महिना दशलक्ष डॉलर जाने २००२ मधील आयातीपेक्षा जास्त झालेली टक्क्यांवर देशाच्या आर्थिक वाढीचा अडणार टक्के अर्थव्यवस्था वाढीचा सरकारी अंदाज ७७ टक्क्यांपेक्षा अधिक सोन्याच्या आयातीमधील (६०८. दशलक्ष डॉलर) कालावधी- ५५. २९ टक्के कचच्या तेलाच्या आयाती मधील घसरण (४.९३ अन्ज डॉलर) ५० टक्क्यांपेक्षा अधिक एकुण आयातीमधील घसरण (६०.૪૪ टक्के एकूण निर्यातीमधील कालावधी एप्रिल तिमाही डॉलर)"

"मेडिक्‍लेम' की कोरोना कवच'? 

आयात घटण्याची कारणे

  • कोरोना विषाणूचा प्रसार
  • देशातील घटलेली मागणी
  • कच्चे तेल, सोने, औद्योगिक उत्पादनांना उठावच नाही
  • चीनसोबतचा वाढलेला तणाव

बहुपयोगी "वन नेशन, वन कार्ड' 

आयातीपेक्षा निर्यात जास्त होणे ही आनंदाची बातमी आहे, लॉकडाउनचा वाढलेला कालावधी, निर्यात बंधने आणि देशातील अर्थव्यवस्थेमध्ये आलेली मंदी यामुळे आयातीमध्ये नेमकी किती घसरण झाली याचा अंदाज घ्यावा लागणार आहे.
- अजय सहाय, महासंचालक, फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India countrys export surplus