भारत बनेल पाचवी मोठी अर्थव्यवस्था - जेटली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

मुंबई - पुढच्या वर्षात भारत जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होईल, अशी अपेक्षा अर्थ आणि कंपनी व्यवहारमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली. 

इंडियन बॅंक असोसिएशनच्या ७१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सोमवारी जेटली यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले. बॅंकिंग क्षेत्राने आत्मपरीक्षण करून दीर्घकालीन विकासासाठी आराखडा तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. उच्च विकासदर गाठताना अर्थव्यवस्थेच्या मूलभूत संरचनेशी त्याची सांगड घालणे आवश्‍यक आहे. वित्तीय तूट आणि विकासदरामधील समतोल राखला पाहिजे, असे ते म्हणाले.

Web Title: India is the fifth largest economy