वित्तीय तूट वाढली

पीटीआय
गुरुवार, 29 मार्च 2018

नवी दिल्ली - भारताची वित्तीय तूट फेब्रुवारीअखेरीस ७.१५ लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. चालू आर्थिक वर्षात वित्तीय तुटीचे सुधारित उद्दिष्ट ५.९४ लाख कोटी रुपये असून, या उद्दिष्टाच्या १२० टक्‍क्‍यांवर वित्तीय तूट पोचली आहे. 

सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते फेब्रुवारी या काळात वित्तीय तूट सुधारित उद्दिष्टाच्या १२० टक्के झाली आहे. खर्चातील वाढ आणि महसुलातील घट याला कारणीभूत ठरली आहे. फेब्रुवारीअखेरीस सरकारने १२.८३ लाख कोटी रुपयांचा महसूल जमा केला असून, तो सुधारित उद्दिष्टाच्या ७९.०९ टक्के आहे. यातील १०.२ लाख कोटी रुपये करातून, बिगर कर महसूल आणि बिगर कर्ज भांडवली जमा यातून १.४२ लाख कोटी आणि १.०५ लाख कोटी रुपये मिळाले आहेत. चालू आर्थिक वर्षातील अकरा महिन्यांत केंद्र सरकारने राज्यांना करातील हिश्‍श्‍यापोटी ५.२९ लाख कोटी रुपये दिले आहेत. या काळात सरकारचा एकूण खर्च १९.९९ लाख कोटी रुपये असून,  सुधारित उद्दिष्टाच्या तो ९०.१४ टक्के आहे. 

Web Title: india The fiscal deficit increased