भारताचा परकी चलन साठा 393.734 अब्ज डॉलरवर

Sakal | Saturday, 15 December 2018

मुंबई: भारताच्या परकी गंगाजळीत या आठवड्यात 16.6 मिलियन डॉलरची सुधारणा झाली आहे. परकी चलन साठा आता 393.734 अब्ज डॉलर इतका झाला आहे. रिझर्व बॅंकेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. मागील आठवड्यातसुद्धा परकी चलनसाठा 932.8 मिलियन डॉलरची वाढ होत 393.718 अब्ज डॉलरवर पोचला होता. मागील काही आठवड्यांमध्ये सातत्याने परकी चलन साठ्यात घसरण होत होती. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया रुपयाच्या मूल्यात होत असलेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर डॉलरची विक्री करत होती. 

एप्रिल महिन्यात परकी चलनाचा साठा विक्रमी पातळीवर म्हणजे 426.028 अब्ज डॉलरवर पोचला होता. भारताच्या परकी चलनाच्या साठ्याने पहिल्यांदाच 400 अब्ज डॉलरची पातळी ओलांडली होती. परंतू त्यानंतर मात्र त्यात सातत्याने चढ उतार होत आहेत. परकी गंगाजळीमध्ये महत्वाच्या देशांच्या चलनाच्या साठ्याचा महत्वाचा हिस्सा असतो. यात अमेरिकी डॉलर हा महत्वाचा घटक असतो. अमेरिकेच्या चलना व्यतिरिक्त युरो, पौंड आणि येनचासुद्धा समावेश भारताच्या परकी चलनाच्या साठ्यात असतो. या साठ्यात 9.7 मिलियन डॉलरची भर पडून तो 368.497 अब्ज डॉलरवर पोचला आहे. 

याशिवाय आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे सोन्याचा साठा. सोन्याच्या साठा 21.150 अब्ज डॉलरवर पोचला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत असलेले विशेष रेखांकन हक्कांमध्ये 2.5 मिलियन डॉलरची घट होत 1.457 अब्ज डॉलरवर पोचले आहेत. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडे  जून 2018 अखेरीस 566 मेट्रीक टन सोन्याचा साठा होता.