SBI च्या खातेधारकांसाठी महत्वाची बातमी; FD चे व्याजदर केले कमी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 September 2020

स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांना पुन्हा एकदा झटका दिला आहे.

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांना पुन्हा एकदा झटका दिला आहे. फिक्स्ड डिपॉझिटवर व्याज दर कमी केले आहेत. एसबीआयने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रिटेल डोमेस्टिक टर्म डिपॉझिटचे 1 ते 2 वर्षाच्या मुदतीवरचे व्याज  0.20 टक्क्याने कमी केलं. त्यामुळे आता एसबीआयच्या एफडीवर मिळणारा फायदा कमी होणार आहे. नवे व्याजदर 10 सप्टेंबर 2020 पासून लागू करण्यात आले आहेत. याआधी एसबीआयने 27 मे रोजी फिक्स्ड डिपॉझिटचे व्याजदर कमी केले होते. 

बँकेचे कर्ज विभागाचे प्रमुख एमसीएलआर मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेटबाबत मोठा निर्णय घेतला होता. एसबीआयने एमसीएलआर रिसेट फ्रिक्वेन्सीला 1 वर्ष मुदतीवरून सहा महिने केलं होतं.

हे वाचा - 20 लाख कोटींच्या 'आत्मनिर्भर' पॅकेजचं काय झालं? केंद्र सरकारने दिला हिशोब

कर्जधारकांना कमी व्याज दराचा फायदा घेण्यासाठी त्यामुळे एक वर्ष वाट पाहण्याची गरज नाही. सध्या एसबीआयचा एक वर्षाचा एमसीएलआर 7 टक्के तर सहा महिन्यांसाठीचा एमसीएलआर 6.95 टक्के इतका आहे. 

जेष्ठ नागरिकांसाठी बँकेने एक एफडी प्रॉडक्ट लाँच केलं होतं. त्यानुसार जेष्ठ नागरिकांना 5 किंवा त्यापेक्षा जास्त मुदतीसाठी रिटेल टर्म डिपॉझिटवर 30 पॉइंटचा अतिरिक्त प्रिमियम मिळेल. ही योजना 31 डिसेंबर 2020 पर्यंत सुरु राहणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india SBI bank FD interest rate reduces