श्रीमंत देशांच्या यादीत भारत 'सहावा'

वृत्तसंस्था
सोमवार, 21 मे 2018

नवी दिल्ली :विकासाच्या वाटेवर असलेल्या भारतीय नागरिकांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ होते आहे. अफ्र्सिया बँक ग्लोबल वेल्थ मायग्रेशन रिव्ह्यूच्या मते, ताज्या आकडेवारीनुसार भारत हा 8,230 अब्ज डॉलरसह जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. 

हा अहवाल देशातील नागरिकांकडे असलेल्या एकूण संपत्तीच्या आधारावर तयार केला जातो. यामध्ये नागरिकांकडील रोख पैसे. शेअर्स, स्थावर मालमत्ता इत्यादी बाबींच्या अंदाजे संपत्ती ठरवली जाते. यामध्ये नागरिकांकडे असलेल्या कर्जाचा सामावेश नसतो. तसेच सरकारच्या मालमत्तेचा देखील समावेश नसतो.  

जगातील सर्वात श्रीमंत देशाच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर असून तेथील नागरिकांची संपत्ती ही भारताच्या तब्बल आठपट म्हणजे 62,500 अब्ज डॉलरच्या घरात आहे. तर श्रीमंत देशाच्या यादीत चीन (24,800 अब्ज डॉलर) व जपान (19500 बिलियन डॉलर) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहे. 

भारतातील वाढते उद्योग व्यवसाय, माहिती तंत्रज्ञान व सेवा क्षेत्राची वाढ, हेल्थकेअर विभागाची प्रगती, शिक्षण व्यवस्थेतील बदल आणि बांधकाम व्यवसायाचे उज्ज्वल भविष्य या आधारित येत्या दशकामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 200 टक्क्यांनी वाढ होईल असा अंदाज अहवालामध्ये करण्यात आला आहे. 

येत्या 10 वर्षात म्हणजे 2027 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था सध्या अनुक्रमे 4 थ्या व 5 व्या क्रमांकावर असलेल्या यु.के (युनायटेड किंग्डम) आणि जर्मनीच्या पुढे जाऊन 4 थ्या क्रमांकाची बनेल. एकीकडे भारत, श्रीलंका, व्हिएतनाम, चीन, मॉरिशस सारख्या देशांची वाढ झपाट्याने होत असताना अमेरिकेची वाढ मात्र प्रचंड संथ गतीने होईल असा अंदाजही अहवाल व्यक्त करतो. सध्या  62,500 अब्ज डॉलरची संपत्ती असलेला अमेरिका पुढच्या 10 वर्षात फक्त 75,100 अब्ज डॉलरवर पोहचेल तर दुसरीकडे चीन मात्र वायुवेगाने 70,000 अब्ज डॉलरवर जाईल. 

जगातील एकूण खाजगी संपत्ती ही 2 लाख 15 हजार अब्ज डॉलरच्या घरात आहे. 

सर्वात श्रीमंत देशांची यादी 

देश                      संपत्ती (बिलियन डॉलर) 

1.  अमेरिका                  62,584   

2 .  चीन                    24,803 

3.  जपान                    19,522 

4.  यु.के.                    9,919

5.  जर्मनी                  9,660

6.  भारत                   8,230

7.  ऑस्ट्रेलिया            6,142 

8.  कॅनडा                   6,393

9.  फ्रान्स                  6,649

10.  इटली                 4,276 

Web Title: India Sixth Wealthiest Country With Total Wealth Of $8,230 Billion