भारत ‘टेरिफ किंग’ - ट्रम्प

पीटीआय
Tuesday, 30 April 2019

वॉशिंग्टन - अमेरिकेकडून आयात होणारी पेपर उत्पादने; तसेच हार्ले डेव्हिडसनवर आकारल्या जाणाऱ्या शुल्कासंबंधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा भारताला लक्ष्य केले. भारत ‘टेरिफ किंग’ असून, चीन व जपान या देशांमुळे अमेरिकेला कोट्यवधी डॉलरचा फटका बसत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

विस्कॉन्सिनमधील ग्रीन बे शहरात आयोजित एका रॅलीदरम्यान ट्रम्प बोलत होते. ते म्हणाले, ‘‘काही देश गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेचा फायदा उचलत आहेत. अमेरिकेकडून आयात केल्या जाणाऱ्या उत्पादनांवर भारताकडून मोठे शुल्क आकारले जाते. चीन, जपानकडूनही याचा कित्ता गिरविला जात असून, त्यामुळे गेल्या काही दशकांत अमेरिकेचे कोट्यवधी डॉलरचे नुकसान झाले आहे. मात्र, यापुढे हे चित्र बदलेल.’’

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India tariff king Donald Trump