कॅप्टन कुल 'माही'ने केली 'या' कंपनीत गुंतवणूक आणि भागीदारी

MS-Dhoni
MS-Dhoni

भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी याने क्रिकेटमधून जरी सन्यास घेतला असला तरीही तो कायम चर्चेत आणि बातम्यांमध्ये राहिलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतरही धोनीची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. धोनीच्या चाहत्यांकडून धोनीने केलेल्या प्रत्येक गोष्टीची वाहवा केली जाते आणि धोनी कायमच चर्चेत राहतो. नुकत्याच धोनीच्या नव्या लूकची देखील प्रचंड चर्चा झाली आणि धोनीच्या चाहत्यांना त्याचा नवा लूक प्रचंड आवडला देखील.

अशातच धोनीच्या आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीबाबत माहिती समोर आली आहे. आपण कायमच विचार करतो की मोठे खेळाडू, सेलिब्रिटी, हिरो हिरोईन त्यांनी कमावलेल्या पैशांचं ते करतात काय ? हे सर्व मोठे लोकं नक्की कसे आणि कुठे गुंतवणूक करतात ? तर या बातमीतून आम्ही तुम्हाला धोनीने केलेल्या गुंतवणुकीबाबत माहिती देणार आहोत.

धोनीची स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप

महेंद्रसिंह धोनीने एका नव्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही कंपनी घरातील सजावट म्हणजेच इंटिरियर डेकोरेशन करणारी कंपनी आहे. या कंपनीचं नाव होम लेन (Home Lane) असं आहे. स्वतः कंपनीकडून याबाबत माहिती पुरवण्यात आली आहे. कंपनीच्या माहितीनुसार महेंद्रसिंह धोनीने होम लेन सोबत स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप करत इक्विटी भागीदारी आणि ब्रँड अँबेसिटर म्हणून तीन वर्षांचा करार केला आहे.

MS-Dhoni
सोनं गाठणार प्रति तोळा एक लाखांचा टप्पा; कधी ते जाणून घ्या?

२०१४ मध्ये सुरु झालीये होम लेन कंपनी

होम लेन ही नुकतीच म्हणजे वर्ष २०१४ मध्ये सुरु झालेली इंटिरियर डिझाईन आणि डेकोरेशन क्षेत्रातील कंपनी आहे. या कंपनीच्या भारत भारत विविध शाखा आहेत. बंगळुरू, चेन्नई, हैद्राबाद, मुंबई, दिल्ली NCR, पुणे, म्हैसूर, कोइंबतूर सह एकूण १६ शहरांमध्ये ऑफिसेस आहेत. महेंद्रसिंग धोनीने केलेल्या गुंतवणूक आणि भागीदारी नंतर येत्या काळात कंपनीचे निर्धारित टार्गेट्स पूर्ण होण्यास मदत होणार असल्याचं होम लेन च्या श्रीकांत ऐय्यार यांनी सांगितलं.

MS-Dhoni
आनंदाची बातमी, पाच रुपयांनी स्वस्त होऊ शकते पेट्रोल-डिझेल

किती रुपये गुंतवले ?

महेंद्रसिंह धोनीसोबत केलेल्या गुंतवणूक आणि भागीदारी करारानंतर पुढील दोन वर्षात कंपनी आणखी २५ लहान आणि मध्यम शहरांमध्ये आपला व्यवसाय वाढवण्यावर भर देणार आहे. ज्यामध्ये कंपनीकडून १०० कोटी रुपयांचा मार्केटिंग वरील खर्च अपेक्षित केला जातोय. दरम्यान धोनीने या कंपनीसोबत गुंतवणूक आणि भागीदारी करार जरी केला असला तरीही नक्की किती रुपयांचा हा व्यवहार आहे याबद्दल येत्या काळात समजू शकणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com