भारतीय पुरुष संघाचा पहिल्या सामन्यात पराभव

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

जाकार्ता (इंडोनेशिया) - आशियाई क्रीडा स्पर्धेतील प्रवेशासाठी न्यायालयीन लढाई लढाव्या लागलेल्या भारतीय पुरुष संघाला प्रत्यक्षात स्पर्धेतील मैदानावरील पहिली लढाई (सामना) गमवावी लागली आहे. तैवानकडून त्यांना ३८-२८ असा पराभव पत्करावा लागला. 

सोमवारपासून हॅंडबॉलच्या सामन्यांना औपचारिक सुरवात झाली. हॅंडबॉलमध्ये १३ संघांचा समावेश असून, भारताचा तैवान, इराकसह ‘ड’ गटात समावेश करण्यात आला आहे. तैवानकडून कर्णधार शियू यिफान याने सर्वाधिक १३ गोल केले. भारताकडून हरेंदर सिंगने ८ गोल केले.

भारतीय हॅंडबॉल संघ क्रमवारीत १२व्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया, उझबेकिस्तान, चीन, ओमान आणि संयुक्त अरब अमिराती या संघांनी माघार घेतल्यामुळे त्यांना या स्पर्धेत प्रवेश मिळाला. भारतीय ऑलिंपिक संघटनेने त्यांना प्रवेश नाकारलाही होता. मात्र, ऐनवेळी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशावरून त्यांनी या संघाची प्रवेशिका पाठवली.  महिला संघात १० संघ असून दक्षिण कोरिया, कझाकस्तान, चीन आणि उत्तर कोरियासह भारताचा ‘अ’ गटात समावेश करण्यात आला आहे. महिला संघाचा पहिला सामना मंगळवारी कझाकस्तानशी होणार आहे.

Web Title: Indian men team defeated in the first match