व्हॉट्सअॅपच्या सीईओपदी एका भारतीयाची वर्णी?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 मे 2018

नवी दिल्ली: 'व्हॉट्सअॅप'च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) एका भारतीयाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मूळचे भारतीय असलेले नीरज अरोरा यांची 'व्हॉट्सअॅप'च्या सीईओपदी नियुक्ती होणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. अरोरा हे सात वर्षांपासून कंपनीसोबत काम करत असून व्हॉट्स अॅपचे सहसंस्थापक जेन कॉम यांनी चार दिवसांपूर्वी राजीनामा दिल्यानंतर त्यांचे नाव पुढे आले आहे. 

'व्हॉट्सअॅप'ने भारतातील प्रमुखाची देखील शोध मोहीम हाती घेतली आहे. आता मात्र 'व्हॉट्सअॅप'च्या ग्लोबल सीईओपदी कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अरोरा हे 'व्हॉट्सअॅप'मध्ये सध्या बिझनेस एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत असून व्हॉट्स अॅपमधील ‘ऑल थिंग्स बिझनेस’ या विभागाचे ते प्रतिनिधित्व करतात. 

अरोरा यांचे शिक्षण दिल्लीतील आयआयटीमध्ये झाले असून त्यानंतर त्यांनी इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए इन फायनान्स अँड स्ट्रॅटेजीची पदवी घेतली.  अरोरा यांनी अॅसिलिओन, टाइम्स इंटरनेट लिमिटेड, गुगल यांसारख्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. शिवाय ते पेटीमच्या संचालक मंडळातही होते. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर गुगलमध्ये सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टमध्ये सत्या नाडेला अशा भारतीय व्यक्ती मोठ्या पदावर कार्यरत आहेत. 
 
Web Title: Indian origin Neeraj Arora could be next WhatsApp CEO