इंडिया पोकर चँपियनशिप्समध्ये देशभरातील स्पर्धकांचा सहभाग

Dan Bilzerian at India Poker Championship 2019
Dan Bilzerian at India Poker Championship 2019

पणजी (गोवा): स्पार्टन पोकर यांनी आयोजित केलेली इंडिया पोकर चँपियनशिपमध्ये (आयपीसी)  सहभागी होण्यासाठी देशभातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. 'आयपीसी'चा थरार वाढविण्यासाठी व इन्स्टाग्रामवर 28 मिलियन फॉलोअर्स असलेला अमेरिकेचा डॅन बिल्झेरिअन यांची उपस्थिती प्रमुख ठरली.

पाच दिवस चालेलल्या चँपियनशिपमध्ये देशभरातील 2000 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. फ्रीझ आउट, हाय रोलर, हेडहंटर आणि अंतिम सामना असे इंडिया पोकर चँपियनशिपचे चार महत्वाचे भाग होते. यावेळी सहा कोटींहून अधिक रक्कमेची बक्षिसे स्पर्धकांनी जिंकली. बिग डॅडी कॅसिनो मध्ये या बक्षिसांचे वाटप करण्यात आले.  

डॅन बिल्झेरिअन, अभिनेते रणविजय सिंघा, बॉलीवूड अभिनेत्री मिनिषा लांबा, कुणाल खेमू याच्यासह खासगी वाहिनीवरील कलाकार उपस्थित होते.

स्पार्टन पोकरचे सीईओ अमीन रोझानी म्हणाले, 'इंडिया पोकर चँपियनशिप या स्पर्धा नेहमीच आणि वर्षानुवर्षे खेळाडूंच्या आवडत्या ठरल्या आहेत. यावेळी मोठा प्रतिसाद लाभला. गेल्या तीन वर्षांपासून ऑनलाइनचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढत आहे. संपूर्ण देशभरातून आलेल्या स्पर्धकांना येथे सहभागी होताना बघणे हा एक वेगळा अनुभव होता.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com