esakal | सेन्सेक्सची साठ हजारांवर मजल; शेअर बाजाराला दिलासा | Share market
sakal

बोलून बातमी शोधा

share market

सेन्सेक्सची साठ हजारांवर मजल; शेअर बाजाराला दिलासा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दर (repo rate) स्थिर ठेवल्याने आज बाजाराला मोठा दिलासा मिळाला. त्यामुळे कालच्या वाढीचे सत्र कायम राहून आज निर्देशांक अर्ध्या टक्क्याच्या आसपास वाढले. सेन्सेक्स (sensex) ३८१.२३ अंश, तर निफ्टी (nifty) १०४.८५ अंश वाढला. विशेष म्हणजे सेन्सेक्सने आज पुन्हा ६० हजारांवर मजल मारली.

हेही वाचा: सीएट टायर्सकडून नव्या स्वरूपातील सीएट शॉपीज

आज दिवसअखेरीला सेन्सेक्स ६०,०५९.०६ अंशांवर, तर निफ्टी १७,८९५.२० अंशांवर स्थिरावला. आज सेन्सेक्समधील ३० प्रमुख कंपन्यांपैकी १७ शेअरचे भाव कोसळत असताना रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअरने सेन्सेक्सच्या वाढीत मोठा वाटा उचलला. रिलायन्सचा शेअर आज तब्बल ३.८४ टक्के म्हणजे ९८ रुपयांनी वाढून २,६७० रुपयांपर्यंत पोहोचला.

आज रिलायन्ससह सेन्सेक्समधील १३ शेअरचे भाव वाढले. इन्फोसिस ( बंद भाव १,७२३ रु.), टेक महिंद्र (१,४४०), एचसीएल टेक (१,३२२), टीसीएस (३,९३५), टाटा स्टील (१,३००), लार्सन अँड टुब्रो (१,७२७) यांचे भाव वाढले; तर हिंदुस्थान युनिलीव्हर (२,६४०), डॉ. रेड्डीज लॅब (४,८४९), कोटक बँक (१,९३५), मारुती (७,४२५), आयटीसी (२३१) तसेच टायटन, एचडीएफसी बँक यांच्या शेअरचे भाव घसरले.

loading image
go to top