अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणांचे संकेत

सरकारच्या केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने चालू आर्थिक वर्षात विकासदर ८.३ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे
अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणांचे संकेत
अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणांचे संकेतsakal media

नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेत पूर्वीपेक्षा अधिक वेगाने सुधारणा होत असल्याचे संकेत मिळत असून चालू आर्थिक वर्षात विकासदर १० ते १०.५० टक्के राहण्याची शक्यता आहे. रेटिंग एजन्सी ब्रिकवर्कने हा अंदाज व्यक्त केला आहे. सरकारच्या केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने चालू आर्थिक वर्षात विकासदर ८.३ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणांचे संकेत
विमानप्रवासाची पुढीलवर्षी हनुमानउडी; मॉर्गन स्टॅन्लेचा अहवाल

अहवालानुसार, सध्या अर्थव्यवस्थेचे निर्देशांक वार्षिक आधारवर पूर्वीपेक्षा चांगले संकेत देत आहेत आणि अपेक्षा आहे की चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर कोविडपूर्व पदावर पोहोचेल. ब्रिकवर्कच्या मते, आम्हाला विश्वास आहे की, २०२१-२२ च्या दुसऱ्या तिमाहीत आर्थिक विकासदर वार्षिक आधारावर ८.३ टक्के राहील. मागील वर्षी याच कालावधीत त्यात ७.४ टक्के घसरण झाली होती.

रेटिंग एजन्सीच्या मते, कोरोना महामारीचा पुन्हा प्रादुर्भाव न झाल्यास येणाऱ्या तिमाहीत आर्थिक वृद्धी आणि तेजी येईल. या आधारावर रेटिंग एजन्सीने माहिती दिली आहे की, आम्ही २०२१-२२ च्या आर्थिक विकासदरात ९ टक्क्यांवरून सुधारणा करून १० ते १०.०५ टक्के करत आहोत.

अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणांचे संकेत
स्मार्ट खबरदारी : नवे AIS कसे आहे?

कोरोनाने गंभीर स्थिती

लसीकरणात वाढ आणि कोविड-१९ च्या रुग्णात घट झाल्याने अधिकाधिक राज्यांमध्ये आर्थिक उलाढालींवरील निर्बंधात सूट देण्यात आली आहे. रेटिंग एजन्सीच्या मते, कोरोना महामारीने अर्थव्यवस्थेची स्थिती गंभीर केली होती. यातून अर्थव्यवस्था पुन्हा सामान्य स्तरावर येण्यात काही कालावधी लागू शकतो, परंतु अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com