भारताचा विकासदर चालू वर्षी 7.4 टक्के राहील - आयएमएफ

पीटीआय
बुधवार, 18 एप्रिल 2018

वॉशिंग्टन - भारताचा विकासदर २०१८ मध्ये ७.४ टक्के आणि २०१९ मध्ये ७.८ टक्के राहील, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणे निधीने (आयएमएफ) व्यक्त केला आहे. याचवेळी बड्या कंपन्यांच्या वाढत्या कर्जामुळे बॅंकांकडून कर्ज वितरणात घट होऊन गुंतवणुकीचा ओघ कमी होईल, असा धोक्‍याचा इशाराही नाणे निधीने दिला आहे. 

भारताचा विकासदर २०१७ मध्ये दुसऱ्या तिमाहीत घसरला होता. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेने गती घेतली आहे. जगभरातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत २०१८ आणि २०१९ मध्ये स्थान मिळवेल. चीनचा विकासदर २०१८ मध्ये ६.६ टक्के आणि २०१९ मध्ये ६.४ टक्के राहील, असा अंदाजही नाणे निधीने व्यक्त केला आहे.

Web Title: India's growth rate to be 7.4 percent this year - IMF