घाऊक चलनवाढीच्या दरात डिसेंबरमध्ये वाढ

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

बटाट्याची सर्वाधिक 26.42 टक्के चलनवाढ झाली असून, अंडी, फळे आणि मांसाच्या चलनवाढीचा दर 2.73 टक्के झाला आहे. एकुणच अन्नधान्य महागाई दर कमी होऊन उणे(-) 0.7 टक्के झाला आहे. अन्नधान्य महागाई दर ऑगस्ट 2015 नंतर पहिल्यांदा उणे झाला आहे.

नवी दिल्ली - घाऊक चलनवाढीमध्ये डिसेंबरमध्ये वाढ झाली असून, ती 3.39 टक्‍क्‍यांवर आली आहे. याआधी नोव्हेंबर महिन्यात घाऊक चलनवाढीचा दर 3.15 टक्के, तर गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात उणे(-) 1.06 टक्केएवढा होता. घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्लूपीआय) घाऊक चलनवाढ मोजली जाते.

कांद्याचे भाव घसरल्याने भाज्यांच्या भावातील घसरण सलग चौथ्या महिन्यात कायम आहे. डिसेंबरमध्ये भाज्यांची चलनवाढ उणे 33.11 टक्क्यांवर आली आहे. दरम्यान, कांद्यांचा महागाई दर 37.20 टक्के झाला आहे. डाळींचे भाव मात्र अद्याप चढे आहेत. डाळींची चलनवाढ 18.12 टक्के झाल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयाने दिली आहे.

बटाट्याची सर्वाधिक 26.42 टक्के चलनवाढ झाली असून, अंडी, फळे आणि मांसाच्या चलनवाढीचा दर 2.73 टक्के झाला आहे. एकुणच अन्नधान्य महागाई दर कमी होऊन उणे(-) 0.7 टक्के झाला आहे. अन्नधान्य महागाई दर ऑगस्ट 2015 नंतर पहिल्यांदा उणे झाला आहे.

इंधन आणि वीजेच्या महागाईचा दर 8.65 टक्के झाला आहे. उत्पादित वस्तूंची चलनवाढ 3.67 टक्‍क्‍यांवर गेली असून, नोव्हेंबरमध्ये ती 3.20 टक्के होती. साखर 28.04 टक्के तर पेट्रोलची आणि हायस्पीड डिझेलची चलनवाढ अनुक्रमे 8.52 टक्के आणि 20.25 टक्के झाली आहे.

Web Title: India's wholesale price inflation marginally up in December