मोदी निती: शेअर बाजारात मोठी भरती

वृत्तसंस्था
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

: केंद्र सरकारने शुक्रवारी केलेल्या 'कॉर्पोरेट टॅक्स'संबंधित घोषणेनंतर शेअर बाजारात आज पुन्हा भरती आली आहे

मुंबई : केंद्र सरकारने शुक्रवारी केलेल्या 'कॉर्पोरेट टॅक्स'संबंधित घोषणेनंतर शेअर बाजारात आज पुन्हा भरती आली आहे. आता कंपन्यांसाठी कॉर्पोरेट टॅक्स 30 टक्क्यांहून घटवून 22 टक्के करण्यात आला आहे, तर 1 ऑक्टोबर 2019 नंतर सुरू होणाऱ्या नव्या कंपन्यांसाठी हा दर 25 टक्क्यांवरून घटवून 15 टक्के करण्यात आला आहे. परिणामी आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सध्या 1,016 अंशांनी वधारला असून तो 39 हजार 346.01 अंशांवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 307 अंशांची वाढ झाली आहे. 

शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 2100 अंशांनी वधारला होता. बाजार सुरु होताच आज सेन्सेक्सने 1111 अंशांची वाढ नोंदविली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी  'कॉर्पोरेट टॅक्स', कॅपिटल गेन टॅक्स आणि बायबॅकसंबंधित मोठ्या घोषणा केल्यानंतर गुंतवणूकदारांचा उत्साह द्विगुणित झाला होता. परिणामी शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसून आला. 

बँकिंग आणि ऑटो कंपन्यांचे शेअर सवंर्धिक वधारले होते. 'कॉर्पोरेट टॅक्स' काम झाल्यामुळे सरकारचा चालू आर्थिक वर्षातील 1.45 लाख कोटी रुपयांचा महसूल कमी होणार आहे. मात्र कंपन्यांना फायदा होणार असल्याने उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे.  आज मुंबई शेअर बाजारात  आयटीसी, एल अँड टी, इंडसइंड बँक, एशियन पेंट्स आणि एम अँड एमचे शेअरचे सर्वाधिक वधारले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indices erase gains, Nifty above 11500 Sensex up 1111 pts