इंडसइंड बँकेचा नफा 985 कोटी रुपयांवर 

वृत्तसंस्था
बुधवार, 9 जानेवारी 2019

मुंबई: खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या इंडसइंड बँकेने सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 985 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. गेल्यावर्षी तुलनेत त्यात 5.20 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत बँकेने 936.25 निव्वळ नफा मिळविला होता. या दरम्यान बँकेचे एकूण उत्पन्न 5,473.54 कोटी रुपयांवरून वाढून 7,232.32 कोटी रुपयांवर पोचले आहे. 

'आयएल अँड एफएस'मुळे बँकेच्या नफ्यावर झाला असून बुडीत कर्जासाठी अधिक तरतूद करावी लागली. परिणामी बँकेचे एनपीए देखील वाढले आहेत. आज  मुंबई बाजारात इंडसइंड बँकेचा शेअर 23.20 (+1.47 टक्के) रुपयांनी वधारून 1600 रुपयांवर व्यवहार करत बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार बँकेचे 96 हजार 381.38 कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IndusInd Bank Q3 net profit rises by 5 pct to Rs 985 cr