esakal | मोदींना यश; उत्पादन क्षेत्राची भरारी
sakal

बोलून बातमी शोधा

मोदींना यश; उत्पादन क्षेत्राची भरारी

मोदींना यश; उत्पादन क्षेत्राची भरारी

sakal_logo
By
पीटीआय

मुंबई: वस्त्रोद्योग, लोह आणि पोलादासारख्या औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनात आणि विक्रीत वाढ झाली आहे. चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कारखाना उत्पादन क्षेत्राची कामगिरी सुधारल्याचे रिझर्व्ह बॅंकेने केलेल्या सर्व्हेक्षणात दिसून आले आहे.  

रिझर्व्ह बॅंकेकडून 2 हजार 700 कंपन्यांच्या उत्पादन आणि विक्रीचा आढावा घेण्यात आला. रसायने आणि रसयानांशीसंबधित उद्योग, लोह-पोलाद, पेट्रोलियम उत्पादने, वस्त्रोद्योगातील विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. माहिती-तंत्रज्ञान, मोटार वाहने आणि वाहतुकीचे सुटे भाग,औषध निर्माण आदी क्षेत्रांची दुसऱ्या तिमाहीत स्थिती सुधारल्याचे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांच्या नफ्यात चांगली वाढ नोंदवण्यात आली असून इतर उत्पन्नात वृद्धी झाली आहे. गेल्या काही तिमाहींपासून तीव्र स्पर्धेने संकटात सापडलेल्या दूरसंपर्क क्षेत्रातील कंपन्या मात्र आता सावरू लागल्या आहेत. घाऊक आणि किरकोळ किराणा क्षेत्राची कामगिरी सुधारली असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील 172 कंपन्यांचा आढावा घेतला असता दुसऱ्या तिमाहीत या कंपन्यांना 17 हजार 700 कोटींचा नफा झाला. यात 5.8 टक्‍क्‍यांची वाढ झाली. 

कंपन्यांच्या नफ्यात घसघशीत वाढ 

रिझर्व्ह बॅंकेने उत्पादन क्षेत्रातील 1 हजार 734 कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीचा आढावा घेतला. या सर्व कंपन्यांना जुलै ते ऑगस्ट या दुसऱ्या तिमाहीत एकूण 47 हजार 100 कोटींचा नफा झाला. नफ्यात गतवर्षाच्या तुलनेत 29.4 टक्‍क्‍यांची वाढ नोंदवण्यात आली. यावरून उत्पादन क्षेत्राने मंदीतून उभारी घेतल्याचे दिसून आले आहे. 

दुसऱ्या तिमाहीतील उत्पादन क्षेत्राची कामगिरी 

2 हजार 700 कंपन्यांकडून एकूण 9 लाख 81 हजार 800 कोटींची विक्री 

71 हजार 900 कोटींचा नफा 

नफ्यात 41.7 टक्‍क्‍यांची वृद्धी 

रसायने, लोह-पोलाद, औषध निर्माण, आयटी, वस्त्रोद्योगांची कामगिरी उंचावली