महागाई घटली; व्याजदर कपात होणार?

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जून 2017

मुंबई: किरकोळ महागाईने पाच वर्षांचा नीचांक गाठला आहे. मे महिन्यात किरकोळ महागाईचा निदर्शक सीपीआय अर्थात ग्राहक किंमत निर्देशांक 2.18 टक्क्यांवर पोचला आहे. अन्नधान्याच्या किंमती कमी झाल्याने महागाईत घट नोंदविण्यात आली. याआधी एप्रिल महिन्यात हा दर 2.99 टक्के तर गेल्यावर्षीच्या मे महिन्यात 5.76 टक्के होता. गेल्या महिन्यात अन्नधान्याचा किरकोळ दर उणे 1.05 टक्क्यांवर आला. याशिवाय, फळे, कपडे, इंधन आणि घरांच्या किंमतीदेखील कमी झाल्या.

महागाईविषयक सकारात्मक आकडेवारीमुळे आता रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात केली जाईल अशी चिन्हे निर्माण झाली आहे. रिझर्व्ह बँकेवर व्याजदर कमी करण्याचा दबाव निर्माण झाला आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याआधी गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात रेपो दर 0.25 टक्क्यानी कमी करुन 6.25 टक्के करण्यात आला होता.

Web Title: Inflation decreased; Interest rates cut?